Uncategorized

डॉ श्रावण रॅपनवाड यांची काँग्रेस प्रदेश महासचिव पदी निवड

मुखेड दि.०१ ऑगस्ट २५
सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उपक्रमशील व्यक्ती म्हणून परिचित सामाजिक कार्यकर्ते डॉ श्रावण गोविंदराव रॅपनवाड यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर पदोन्नती होऊन महासचिव पदावर फेर निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पद जाहीर होताच पहिल्याच दिवशी डॉ.रॅपणवाड यांचा प्रदेश कार्यालयात सत्कार करून शुभेच्छा दिल्या.


ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वातील नूतन कार्यकारणी काल जाहीर केली. त्यात मुखेडचे सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा भारत यात्री डॉ. श्रावण रॅपनवाड यांची पदोन्नती होऊन प्रदेश महासचिव पदी निवड जाहीर केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ५ महिने चाललेल्या ‘भारत जोडो यात्रा’ मध्ये मराठवाड्यातील एकमेव भारत यात्री म्हणून कन्याकुमारी ते काश्मीर ४०८० किमी पदयात्रा केलेले काँग्रेस जन आहेत. प्रदेश सचिव पदावर असताना धाराशिव आणि हिंगोली जिल्हा सहप्रभारी म्हणून केलेले कार्य आणि उपक्रमशीलतेची दखल घेऊन वरिष्ठांनी त्यांची प्रदेश महासचिव पदावर निवड जाहीर केली आहे. कार्यकारणी जाहीर होताच मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचा बुधवारी पहिल्याच दिवशी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.डॉ. रॅपनवाड यांच्या प्रदेश महासचिव पदी निवड झाल्याबद्दल खा. रवींद्र चव्हाण, ए आय सी सी चे सचिव रवींद्र दळवी, काँग्रेस सभागृह नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अमित भैय्या देशमुख, काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष प्रा.भानुदास माळी, जिल्हाध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर,राजेश पावडे, माजी जि.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, विश्वनाथराव कोलमकर, डॉ रामराव श्रीरामे आदींसह अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button