नांदेडच्या फेऱ्या वाचणार; मुखेडला वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय मंजूर, आमदार डॉ. तुपार राठोड यांच्या प्रयत्नांना यश!

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड :- ०६ नोव्हेंबर २६
मुखेड तालुक्याच्या न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आमदार डॉ. तुपार राठोड यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून, मुखेड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयस्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी सुरू असलेल्यालिंक कोर्टाचे आता स्वतंत्र न्यायालयात रूपांतर होणार आहे.
मुखेड तालुक्यातील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी नांदेड येथे जावे लागत असल्याने वेळ, पैसा आणि श्रम खर्च करावे लागत होते. हीगैरसोय दूर करण्यासाठी मुखेड येथे वरिष्ठ स्तरावरील दिवाणीन्यायालय सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. यासाठी आमदारडॉ. तुपार राठोड यांनीविधी व न्याय विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
अखेर त्यांच्या प्रयत्नांना मंत्रिमंडळाच्या मंजुरीमुळे यश मिळाले आहे. यापूर्वी मुखेड येथे केवळ लिंककोर्टाची व्यवस्था मंजूर होती. मात्र, आता याव्यवस्थेचे पूर्णवेळ स्वतंत्र न्यायालयात रूपांतर होणारअसल्याने तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुखेड हे भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण क्षेत्र आणि मोठी लोकसंख्या असलेले तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालयसुरू झाल्याने स्थानिक नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी नांदेडच्या फेऱ्या मारण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
या निर्णयामुळे केवळ नागरिकांची गैरसोय दूर होणार नाही, तर मुखेडच्या न्यायव्यवस्थेला अधिकबळकटी मिळणार आहे. तसेच न्यायालयीनकामकाजासाठी आवश्यक पदनिर्मिती आणि इतर प्रशासकीय सुविधांचाही मार्ग मोकळा होणार आहे.
आमदार डॉ. तुपार राठोड यांच्या पाठपुराव्यामुळे मुखेडच्या न्यायालयीन सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडली असून, या निर्णयाचे तालुक्यातून स्वागत होत आहे.



