Uncategorized
सेलू येथील पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार मेळाव्यास मुखेडहून मोठ्या संख्येने पत्रकार जाणार – महेताब शेख.

मुखेड / प्रतिनिधी.
मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्ण परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ व सेलू तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित आदर्श जिल्हा व तालुका पुरस्कार वितरण तसेच पत्रकार मेळावा दि.०१ फेब्रुवारी रोजी परभणी जिल्हयातील सेलू येथे आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यास मुखेड तालुक्यातील पत्रकारांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषद मुबंई संलग्न मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेताब शेख व पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
सेलू येथील साई मंगल कार्यालयात दि.०१ फेब्रुवारी २०२५ रोजी सदरील कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख हे राहणार असून या कार्यकमासाठी परभणी जिल्हयाच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर व सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, विश्वस्त किरण नाईक,शरद पाबळे,अध्यक्ष मिलिंद अष्टीकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे,कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख,उपाध्यक्ष गोपी लांडगे, गणेश मोकाशी,हेमंत वनजू, अविनाश भांडेकर,चंद्रकांत बरदे, विभागीय सचिव दिपक कैतके, पी.पी.कुलकर्णी,रवी उबाळे, प्रदिप घुमटवार,शिखरचंद बागरेचा, मनोज खांबे, सचिन शिवशेट्टे, अमोल खरे, चंद्रकांत क्षीरसागर, राज्य प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी, सहायक राज्य प्रसिध्दी प्रमुख भरत निगडे, राज्य महिला आघाडी प्रमुख शिवभा जयपूरकर, डीजीटल मिडिया परिषदेचे राज्यप्रमुख अनिल वाघमारे,डीजीटल मिडिया परिषद कार्याध्यक्ष सनी शिंदे, डीजीटल मिडिया प्रमुख परिषद उपाध्यक्ष अनिल उंबरकर आदींची प्रमूख उपस्थिती राहणार आहे.तरी या मेळाव्यास मुखेड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी सेलू येथे सकाळी ९:३० वाजता उपस्थित राहून परिषदेने आयोजित केलेल्या एकता रॅलीस सहभागी व्हावे असे आवाहन मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेताब शेख,सचिव राजेश बंडे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी संघटक अॅड संदीप कामशेट्टे,जेष्ठ पत्रकार यशवंतराव बोडके,सल्लागार दादाराव आगलावे,अॅड आशिष कुलकर्णी, कार्याध्यक्ष नामदेव श्रिमंगले,उपाध्यक्ष दत्तात्रय कांबळे, रामदास पाटील,संघटक संजय कांबळे, कोषाध्यक्ष जगदीश जोगदंड,जैनोदीन पटेल, विठ्ठल पाटील,राजु रोडगे,गणेश आंबेकर यांनी केले आहे.



