व्हॉलिबॉलच्या महिला व पुरुष गटांमधे सोहेल एलेवन मुखेड तर बँक ऑफ महाराष्ट्रा पुणे महिला संघ प्रथम

मुखेड प्रतिनिधी:-
मुखेड :- माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड यांच्या बाढदिवसा निमित्य मुखेड येथील जिल्हा परिषदहायस्कूल मुलींच्या शाळेच्या मैदानात तिन दिवसीय महिला व पुरुष गटांचे व्हॉलिबॉल सामने घेण्यात आलेया अटीतटीच्या सामण्यात सोहेल एलेवन मुखेड मुलांचा संघ व बँक ऑफ महाराष्ट्रा पुणे महिला संघ प्रथमक्रमांक मिळविला.

मुखेड येथे दि. २४ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान व्हॉलिबॉलचे डे नाईट पद्धतीने सामने खेळवण्यातआले. या स्पर्धेत एकसे बढ़कर एक टिमांचा सहभाग घेतला होता. यात मुलींच्या संघातून ५१ हजाराचे प्रथमबक्षिस बँक ऑफ महाराष्ट्रा पुणे तर ३१ हजाराचे द्वितीय क्रमांकाचे बक्षिस लातूर स्पायकर लातूर या संघानेमिळविला. तर तृतीय क्रमांकाचे बक्षिस पोलीस संघ मुंबई ने मिळविले, तर उत्तेजनार्थ चौथा क्रमांकाचेबक्षिस महाराष्ट्र क्लब लातूर या संघाने मिळविले, तर मुलांच्या गटातुन ५१ हजाराचे प्रथम बक्षीस सोहेलएलेबन मुखेड संघाने मिळविले. तर द्वितीय क्रमांकाचे ३१ हजाराचे चक्षिस अमन क्लब बिड संघाने मिळविले. तर तृतीय क्रमांकाचे बक्षिस जि.जि. राठोड क्लब मुखेड संघाने मिळवले तर उत्तेजनार्थ चौथा क्रमांकरावनकोळा क्लब रावनकोळा या संघाने मिळविले. या स्पर्धेसाठी मुलांच्या गटासाठी प्रथम ५१ हजाराचेबक्षिस संजय रावनगावकर यांच्या वतीने देण्यात आले. तर ३१ हजाराचे व्दितिय क्रमांकाचे बक्षिस गंगाधरपिटलेवाड यांच्या वतीने देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे २१ हजाराचे बक्षिस माजी उपसभापती मारोतीफसकुलवाड यांच्या वतीने देण्यात आले. तर उत्तेजनार्थ ११ हजाराचे बक्षिस माजी नगरसेवक उत्तम बनसोडेयांच्या वतीने देण्यात आले. तर बेस्ट शुटर साठी ५ हजाराचे बक्षिस उमेश बनसोडे यांच्या वतीने, बेस्टलिफ्टर बिलास पाटील उमरदरिकर यांच्या वतीने देण्यात आले. तर मुलींच्या गटासाठी प्रथम क्रमांकाचे ५१हजाराचे बक्षीस राजकुमार बामने व गणेश पाटील बेळिकर यांच्या वतीने, द्वितीय क्रमांकाचे ३१ हजाराचेबक्षिस मनोज कांबळे सावरगावकर यांच्या वतीने तृतीय क्रमांकाचे २१ हजाराचे बक्षिस विनोद दंडलवाडयांच्या वतीने तर उत्तेजनार्थ ११ हजाराचे बक्षिस हाणमंत नरोटे यांच्या वतीने, प्रतिक गायकवाड यांनीकामगिरी केली.




