शालेय गुणवत्ता वाढिसाठी मातापालकांचे योगदान महत्वाचे -व्यंकटेश चौधरी

विद्यार्थी शाळेत आला तरच तो शाळेत शिकवले जाणारे घकट आत्मसात करु शकतो.यासाठी वडिल सकाळी कामावंर जातात. वडिला पेक्षा मातेला आपल्या मुलांची काळजी जास्त असते. मुलांच मातेशी जवळीकता अधिक असते ती जर ठरवली तर एकही दिवस आपला मुलाला शाळेपासून वंचित राहु देणार नाही. जर मुल शाळेत आल तर ते वर्गात आपसुकच शिकतात. यामुळे शालेय गुणवत्ता वाढिसाठी मातापालकांचे योगदान महत्वाचे असे मनोगत साहित्यिक तथा शिक्षणाधिकारी मनपा व्यंकटेश चौधरी यांनी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुणेगांव येथे घर घर संविधान अंतर्गत क्रांतीज्योती साविञीबाई फुले जयंती व राजमाता जिजामाता जयंती व संविधान दिन अमृत उत्सव अंतर्गत मातापालक मेळावा व विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले. या प्रसंगी पुणेगावचे सरपंच हणमंतराव पुयड, केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड, शिक्षक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष दत्तप्रसाद पांडागळे, पोलिस पाटिल विलासर पुयड, शा.व्य.स.अध्यक्ष सौ.चंद्रकलाबाई पुयड बचत समुहाचे अध्यक्ष लक्ष्मीबाई पुयड, संजय गांधी माध्यमिक विद्यालय चे शा .व्या .समिती अध्यक्ष मनोहर पुयड,मुख्याध्यापक गणेश टेकाळे यांची उपस्थिती होती.
यावेळी “मी सावित्रीबाई बोलते” यावर इयत्ता ३रीतील कु काजल पुयड व “मी जिजाऊ बोलते” यावर इयत्ता ४थीतील कु नंदिनी पुयड हिने प्रखर विचार मांडत उपस्थितांची मने जिंकले.यासह अनेक देशभक्तपर गीत,प्रबोधनात्मक नाटिका सादर करण्यात आले .
या कार्यक्रमाचे सुञसंचालन सौ सुनंदा बनकर यांनी तर सौ.मधुमती बोराळे यानी आभार मानले.




