महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबीराची सांगता

मुखेड प्रतिनिधी :-
येथील वीरभद्र शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष वार्षिक युवक शिबीर मौजे बेरळी खु.येथे अतिशय थाटात दि.09 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले होते . समारोप समारंभ दि.15 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरभद्र शिक्षण संस्थेचे सचिव रणजित पाटील हंगरगेकर , विशेष अतिथी म्हणून संस्थेचे सहसचिव शंकरराव बसापूरे तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , जि.प.प्रा.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.के.ए. सय्यद , सहशिक्षक जगन्नाथ राठोड , थगनारे हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे , सूत्रसंचालन कु.मंजुषा पुटवाड तर आभार प्रदर्शन कु.नंदिनी वाघमारे यांनी केले .
प्रास्ताविकातून प्रा.डॉ. एकलारे यांनी दि.09 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात आलेले विविध उपक्रम , स्वयंसेवक व स्वयंसेविकेच्या उन्नतीसाठी केलेल्या उपाय योजनेची सविस्तर माहिती दिली . विद्यार्थी आपल्या शिबीर काळात आलेले अनुभव सांगताना भावनिक झाले . बेरळी खु.येथील प्रथम नागरिक सरपंच सौ.रेणुकाताई भागवतराव तोटेवाड यांच्या घरी शोककळा पसरल्याने स्व.योगेश तोटेवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आले .
मान्यवरांच्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबीरातून विशेष आलेले अनुभव हे प्रत्येक प्रसंगी शिक्षकाच्या भूमिकेतून कार्य करीत असतात . गावातील प्रत्येक गोष्ट ही भविष्यात उत्तम कामगिरी बजावताना कल्पकता शिकवत असते . नेतृत्व क्षमता , निर्णयक्षमता , परस्पर सहकार्य , सहनशीलता , स्वाभिमान , राष्ट्रीयता उराशी बाळगून चांगले वर्तन करावे .महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रकल्प व अंमलबजावणी सदैव स्मरणात राहतील असे मौलिक मार्गदर्शन केले .
शिबीराच्या यशस्वितेसाठी रासेयो सहकार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. भारत केंद्रे , प्रा.श्रीनिवास शिंदे , प्रा.गजानन शिवशेट्टे , श्रीमती वैशाली पाटील , प्रा.डी. एम.गायकवाड , प्रा.डॉ. संतोष शेंबाळे , स्वयंसेवक सचिन वडजे , गजानन देवकत्ते , निखिल हिवराळे , व्यंकटेश देवकत्ते , माधव पवार , मुबारक पटेल , नागेश होनशेट्टे , धीरज माळगे , शुभम डुबुकडवाड , राजेश शिरबरतळ , सुजीत सोंडारे इत्यादींनी परिश्रम घेतले .याप्रसंगी बहुसंख्येने नागरिक , प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थिती होती .



