दोन आठवड्यात चोरट्यांनी 9.60 लाख रुपयांची रोकड व दागिने चोरून नेले

चोरीच्या घटना रोखण्यात मुखेड पोलीस प्रशासनाला अपयश
मुखेड प्रतिनिधी:- तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अवघ्या दोन आठवड्यात मुखेड तालुका मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तीन चोरीच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत विविध ठिकाणांहून 9 लाख 60 हजार रुपयांची रोकड व दागिने चोरीला गेले आहेत. पोलिस प्रशासनाला अद्यापही चोरट्यांवर अंकुश लावता आलेला नाही. त्यामुळे तालुक्यात प्रत्येक गावात (दवंडी) कर लावून नागरिकांना जागरूककेले जात आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या चोरीच्या घटनांवर नजर टाकली तर 3 फेब्रुवारीला इटग्यालप रिसरात घर फोडून 4 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज, 6 फेब्रुवारीला बिल्लाळी परिसरात घर फोडून 2 लाख 80 हजार रुपयांचा तर 13 फेब्रुवारीला औराळ परिसरातील घर फोडून 2 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुखेड मध्ये ठिकठिकाणी होत असलेल्या चोरीच्या घटना रोखण्यात पोलीस प्रशासनाला यश येत नसल्याने पोलीस अधीक्षकांनी या घटनेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आता मुखेड मधील नागरिकांकडून होत आहे.



