Uncategorizedशहर

मुखेड येथे आजपासून तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन!

मुखेड प्रतिनिधी:-

महाराष्ट्राचा आराध्य दैवतकुळवाडी भूषणजाणता राजाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त मुखेड येथे तीन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 17 फेब्रुवारी 2025 भव्य रांगोळी स्पर्धांचा आयोजन करण्यात आला असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्या राजश्री नागनाथराव लोखंडे तर उद्घाटक म्हणून डॉमाधवी सुभेदार या उपस्थित राहणार आहेतदिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती खुशालराव पाटील उमरदरीकर हे राहणार आहेत तर उद्घाटक म्हणून माजी आमदार हाणमंतराव पाटीलबेटमोगरेकर हे उपस्थित राहणार आहेतदिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी साडेआठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आमदार डॉतुषार गोविंदराव राठोड यांच्या शुभहस्ते भगव्याध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे यावेळी तहसीलदार राजेश जाधवमाजी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवारपोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे आदीसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहेसकाळी ९.३० वाजता राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे चौक बाराळी नाक्यापासूनभव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे.

दुपारी दोन वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड यांच्यावतीने शिव महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहेदुपारी चार वाजता भव्य पालखी सोहळा शिवकालीन देखाव्यासह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

यावेळी डॉवीरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येणार असून कार्यक्रमाचेअध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड तर उद्घाटक म्हणून दिलीप पाटील बेटमोगरेकर हेउपस्थित राहणार आहेत.

तीन दिवसीय या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या सर्व कार्यक्रमास शिवप्रेमी जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थितराहावे असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष नागनाथराव लोखंडेशिवजन्मोत्सव समितीचेअध्यक्ष नरेश इंगोलेसचिव योगेश पाटील जाधव खंडगावकरउपाध्यक्ष अविनाश पाटील मसलगेकरप्रशांत उल्लेवाडसहसचिव दीपक पाटील जुनेकोषाध्यक्ष बालाजी माधवराव इंगोलेसौरभ पाटीलजोगदंडयोगेश पाटील हिवराळेमाधव देवकतेविश्वजीत पाटील इंगोलेसुरज पाटील जाधवसचिनरिंदकवालेसहसल्लागार विशाल बाबळेसचिन पाटील इंगोलेरामदास पाटील जाधवश्याम पाटीलइंगोलेबालाजी पाइंगोलेगंगाधर पाटील जाधव आदींनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button