बारावी परीक्षेच्या तणावातून मुखेडात विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या तालुक्यात हळहळ

मुखेड / प्रतिनिधी
बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे पेपर अवघड गेल्याने नैराश्याचा गर्तेतून पुढील करिअर बाबतीत तणावात असलेल्या एका युवतीने मुखेड शहरातील फुलेनगर येथे राहत्या घरी गळफास घेवून आपले जीवन संपवले आहे.ही घटना १७ रोजी सोमवारी दुपारी ४ चे दरम्यान झाली असून या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे याबाबत वृत्त लिही पर्यंत पोलीस स्टेशन येथे कुठीलीही नोंद झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की
लातूर बोर्ड चे १२ वी. चे मुख्य परीक्षांना ११ फेब्रुवारी पासुन सुरूवात झाली आहे शैक्षणिक जीवनाला कलाटणी देणारी ही परीक्षा म्हणून पाहिले जाते
शहरातील फुले नगर येथील वास्तव्यास असलेल्या मुस्कान महेबूब शेख वय १८ वर्ष रा फुलेनगर मुखेड ही विद्यार्थिनी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात १२ वी ची परीक्षा देत आहे मुस्कान ही शाहीर अण्णा भाऊ साठे महाविद्यालय १२ वी कला या शाखेत शिक्षण घेत होती महात्मा ज्योतिबाफुले महाविद्यालय येथे ती १२ वी कला शाखेची परीक्षा सुरू असताना दि ११ फेब्रुवारी रोजी इग्रजीचा आणि १२ फेब्रुवारीला हिन्दीचा पेपर मुस्कानने दिला होता. परीक्षेचा पेपर काहीसा अवघड गेल्याने ती दोन दिवस पासून तणावात असल्याचे पालकाने सांगितल
सोमवारी दि १७ फेब्रुवारी सोमवारी दुपारी तणाव सहन न झाल्याने नैराश्येच्या गर्तेत असलेल्या मुस्कान ने ४.३० वाजता राहत्या घरात छताच्या लोखंडी हुक ला दोरीच्या साह्याने गळफास लावून आपले जीवन संपवले आहे
तत्काळ तिला वैद्यकीय मदत मिळवि म्हणून उपजिल्हा रुग्णालयात हलवले तोपर्यंत उशीर झाला होता. तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले
परीक्षेच्या तणावातून तिने आत्महत्या केल्याची माहिती मुलीच्या वडिल मेहबूब शेख यांनी रडवेल्या अवस्थेत दिली
शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे पाठविण्यात आला आहे आज १७ रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत वडील बांगडी विकण्याचा व्यवसाय करीत असून आई घरकाम करते तिच्या पश्चात चार बहिण आई वडील असा परीवार आहे
याबाबत पोलीस स्टेशन येथे कुठल्याही प्रकारचे नोंद झाली नव्हती कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले
या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे

पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची गरज मुलांवर ताण येऊ नये, याची जबाबदारीशिक्षकांनी आणि पालकांनी घेणं गरजेचं आहे.



