घाबरून जाऊ नका ‘फेसबुक तुमचे फोटो वापरणार’ संदेश खोटा अन् अफवा पसरवणारा

मुखेड प्रतिनिधी:- १४ ऑगस्ट २५
काल पासून अनेकांनी फेसबुकवर एकसारखी पोस्ट केली आहे. यात म्हटले आहे की, फेसबुकवर नवीन नियमावली उद्यापासून लागू होत आहे. यात तुमचे फोटो वापरण्याची परवानगी दिली जाईल. ही परवानगी नाकारण्यासाठी फेसबुकवर हा संदेशपोस्ट करा. याबाबत सायबर तज्ज्ञांशी जाणून घेतले असता या संदेशात तथ्य नसून, तो अफवा पसरवणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
फेसबुकवर पोस्ट होत असलेला हा मेसेज प्रत्यक्षात फेसबुकवर फिरणारा एक जुना आणि अफवा पसरवणारा आहे. यात दिलेली माहिती कायदेशीरदृष्ट्या किंवा तांत्रिकदृष्ट्या खरी नाही. केवळ फेसबूक वापरकर्त्यांना घाबरवून सोडण्यासाठी असा संदेश तयार करण्यात आला आहे. अनेक वापरकर्ते कोणतीही माहिती न घेता सरळसोटपणे तो व्हायरल करत आहेत.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ संवादाचे साधन नसून, माहिती, व्यवसाय, मनोरंजनआणि मार्केटिंगसाठी एक प्रभावी व्यासपीठ झाले आहे. मेटा प्लॅटफॉर्म्स इन्क. (Meta Platforms Inc.) ही कंपनी फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅप यांसारखी लोकप्रिय सोशल मीडिया ॲप्सचालवते. या ॲप्सचा वापर करताना प्रत्येक वापरकर्त्याने त्यांच्या पॉलिसी म्हणजेच अटी व शर्ती(Terms & Conditions) आणि गोपनीयता धोरण (Privacy Policy) समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
ॲप इन्स्टॉल आणि परमिशन्स कोणतेही ॲप इन्स्टॉल करताना, त्याचा योग्यरीत्या वापर करण्यासाठी तेॲप काही परवानग्या मागते उदा:- ॲप इन्स्टॉल आणि परमिशन्स
फेसबुक (मेटा) च्या धोरणांनुसार, तुम्ही तुमच्या फेसबुक प्रोफाइल किंवा अल्बमवर शेअर केलेले तुमचे वैयक्तिक फोटो, त्यांच्या गोपनीयता सेटिंग्ज आहेत ज्या तुम्ही नियंत्रित करू शकता.



