शहर

नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत मोठी चुरस; संचालक पदासाठी मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांच्यासह दिग्गजांची उडी!

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड: २९ जून २६ 

बहुचर्चित नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेबँकेच्या संचालक मंडळाच्या २३ जागांसाठी आतापर्यंत तब्बल ८० दिग्गजांनी शड्डू ठोकला असूनयात मुखेडचे आमदार डॉतुषार राठोड यांच्यासह जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांचा समावेश आहेउद्या (३० जूनउमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने ही संख्या २०० च्या पारजाण्याची दाट शक्यता आहे.

तोट्यातून नफ्यात आलेल्या बँकेवर वर्चस्वाची लढाई मागील अनेक वर्षे तोट्याच्या गर्तेत अडकलेली नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक आता नवसंजीवनी घेत तब्बल साडेचार ते पाच कोटींच्या नफ्यात आली आहेबँकेची आर्थिक स्थिती सुधारल्याने या महत्त्वाच्या संस्थेवर आपले वर्चस्व असावेयासाठी जिल्ह्यातील आजीमाजी लोकप्रतिनिधीमाजी झेडपी अध्यक्षसदस्य आणि नगरसेवकांनी कंबर कसली आहे.

रिंगणातील प्रमुख चेहरे २९ जूनपर्यंत प्राप्त झालेल्या ८० अर्जांमध्ये बड्या राजकीय नेत्यांचा समावेश आहेविशेषतः मुखेडचे आमदार डॉतुषार राठोडकिनवटचे आमदार भीमराव केराम आणि हदगावचे आमदार बाबुराव कदम या तीन विद्यमान आमदारांनी आपले अर्ज दाखल केले आहेतयासोबतच माजी जि.अध्यक्ष दिलीप पाटीलनगरसेवक दिलीप कंदकुर्तेमाजी जि.सदस्य लक्ष्मण ठक्करवाडमीनल पाटीलप्रणिता देवरेचिखलीकरमारोतराव कवळेसंगीता पाटीलराजेश देशमुखअनिलपाटीलशिवकुमार भोसीकर आणि श्रावण भिलवंडे या दिग्गजांनीही संचालक पदासाठी दावा ठोकला आहेशेवटच्या दिवशी या यादीत आणखी काही धक्कादायक नावांची भर पडू शकते.

या निवडणुकीत प्रार्थमिक कृषी पतपुरवठा  वि.कासेवा सहकारी संस्था तसेच धान्य अधिकोषसहकारी संस्था यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रत्येकी  प्रतिनिधी निवडला जाणार आहेनागरी सहकारी बँकानागरी सहकारी पतसंस्थाग्रामीण बिगर शेती पतसंस्थापगारदारनोकरांच्या सहकारी पतसंस्थाप्रक्रिया  पणन सहकारी संस्था इत्यादी मतदारसंघातून एक प्रतिनिधीवरील प्रमाणे  आणि  मतदार संघात समावेश नसलेल्या इतर सर्व सहकारी संस्था  व्यक्ती सभासद म्हणून एक प्रतिनिधीअनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी म्हणन एकमहिला प्रतिनिधी दोनइतर मागासवर्गीय प्रतिनिधी एक आणि भटक्या विमुक्त जाती जमाती  विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी म्हणूनएका संचालकाची निवड केली जाणार आहेअशा एकूण २३ संचालक पदासाठी १२०० हून अधिक सभासदांमधून ही निवडणूक होत आहे.

३० जून रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतीलया अर्जाची  जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून छाननी केली जाईलत्यानंतर  जुलै रोजी वैध उमेदवारांची यादी घोषित केली जाईलउमेदवारी मागे घेण्यासाठी  जुलै ते १६ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे१७ जुलै रोजी रिंगणातील उमेदवारांची यादी तसेच उमेदवारांना मिळालेल्या निशाणीचे वाटप करण्यात येणार आहे२६ जुलै रोजी मतदान होणार आहे२८ जुलै रोजी मतमोजणी होऊन अंतिम निकाल घोषित करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button