Uncategorized

दुचाकीच्या टँक कव्हरमध्ये पिशवीत ठेवलेले चार लाख रुपये घेवुन चोरटे पसार.

मुखेड / प्रतिनिधी

     मुखेड बस स्थानकासमोरील रोडवर मोटारसायकल पार्क करुन किराना दुकानातून होळी सणासाठी खोब-याचे हार आणण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीच्या मोटारसायकलच्या टँक कव्हरमध्ये पिशवीत ठेवलेले चार लाख रुपये घेवुन अज्ञात दोन पुरष व दोन महिला चोरटे झाले पसार झाल्याची घटना दि.२२ मार्च रोजी घडली, सदर घटना दुपारी ३:४५ वाजताच्या सुमारास मुखेड बसस्थानकासमोर घडली.याप्रकरणी फिर्यादिच्या फिर्यादिवरुन मुखेड पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  सविस्तर वृत असे की मुखेड तालुक्यातील मौजे बेरळी येथील रहिवाशी असलेले फिर्यादी नितीन ज्ञानोबा बेळीकर वय ३० वर्ष यांनी दि.२२ मार्च रोजी दुपारी ३:४५ वाजताच्या सुमारास मुखेड शहरातील बसस्थानक समोर मुखेड -जांब राज्यमहामार्ग रोडवर आपली दुचाकी क्रमांक एम.एच.२६ बी.जी.१८२७ ही गाडी तिथे पार्क करुन समोरील किराना दुकानातून दोन दिवसावर होळी सण असल्यामुळे खोब-याचे हार आणण्यासाठी गेले होते तेव्हां याचा पत्ता ठेवुन नितीन बेळीकर यांच्या मोटारसायकलच्या टँक कव्हरमध्ये पिशवीत ठेवलेले चार लाख रुपये घेवुन अज्ञात दोन पुरूष व दोन महिला चोरटे मुखेड,जांब बु दिशेने पांढऱ्या रंगाच्या स्वीप्ट कारमध्ये बसून पसार झाले आहे.दिवसा ढवळ्या चोरट्यांनी एवढी मोठी रक्कम  पळविल्यामुळे नागरिकांत भितिचे वातावरण पसरले असुन या घटनेचा जलदगतीने तपास करुन चोरट्यांचा बबंदोबस्त करावा व बेळीकर यांना न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी, पोलीस निरिक्षक लक्ष्मण केंद्रे, सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण,पोकाॅ सिद्धार्थ वाघमारे, पोकाॅ प्रदीप शिंदे, पोकाॅ किरण वाघमारे, डिएसबी विभागाचे पांडुरंग पाळेकर, चंपतराव कदम यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेचा पंचनामा केला.सदर घटनेनंतर पोलिस विभागाच्या वतीने घटना घडलेल्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणी करण्यात येत आहे.या घटनेप्रकरणी नितीन ज्ञानोबा बेळीकर यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिस स्टेशन मुखेड येथे दि.२२ मार्च रोजी कलम ३७९/३४ भादवी नुसार रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button