क्राईम

लोहा शहरात बंदी असलेल्या मटका जुगाराचा उच्छाद; लालसेपोटी गरीबांचे संसार उध्वस्त!

लोहा (विशेष प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १३ जून २६

लोहा शहरात सध्या कायद्याचे धिंडवडे उडवत बंदी असलेल्या मटका जुगाराचा बाजार छुप्या पद्धतीने जोमात सुरू आहेझटपट श्रीमंत होण्याच्या आणि पैशांच्या लालसेपोटी अनेक गरीब  कष्टकरी कुटुंबेया विळख्यात अडकली असूनत्यांचे हसतेखेळते संसार उध्वस्त होत आहेतमात्रसर्वकाही उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही स्थानिक पोलीस प्रशासन यावर कोणतीही ठोस कारवाई का करत नाहीअसा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

लोहा शहरात मटका जुगार पूर्णपणे प्रतिबंधित असलातरी काही विशिष्ट गल्ल्यांमध्ये आणि अडगळीच्या ठिकाणी हा काळा धंदा अत्यंत पद्धतशीरपणे चालवला जात आहेमटका चालवणारे मुख्यसूत्रधार (मटका किंगकोण आहेतत्यांचे अड्डे कुठे आहेत आणि ही साखळी कशी चालतेयाची खडान्खडा माहिती स्थानिक यंत्रणेला असूनहीकेवळ कागदोपत्री किंवा तात्पुरती कारवाई करून मूळ मटका किंगला मोकळे रान दिले जात असल्याचा आरोप होत आहे.

रोजंदारीवर काम करणारे मजूररिक्षाचालक आणि कष्टकरी वर्गाला पैशांचे आमिष दाखवून या जुगाराच्या जाळ्यात ओढले जात आहेकष्टाची कमाई या मटक्यात गमावल्यामुळे अनेक घरांमध्येरोजची चूल पेटणे कठीण झाले आहेतर वादविवाद आणि कौटुंबिक छळामुळे संसार रस्त्यावर आले आहेतयाशिवायशहरातील तरुण पिढीही या छुप्या जुगाराच्या आहारी जात असल्याने लोहा शहराचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे.

लोहा शहरात उघड गुपित असलेल्या या मटका किंगवर अद्याप मोठी आणि कडक कारवाई का झाली नाहीया अवैध धंद्यांच्या मागे कोणत्या राजकीय नेत्याचा किंवा बड्या अधिकाऱ्याचा ‘वरदहस्त‘ आहेदरमहा होणाऱ्या कथित ‘अर्थपूर्ण‘ तडजोडींमुळेच प्रशासन डोळे झाक करत आहे काअसे अनेक गंभीर प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

शहरातील गोरगरिबांचे संसार उध्वस्त करणाऱ्या या मटका किंगचा आणि त्यांच्या पाठीराख्यांचा पर्दाफाशकरणे गरजेचे आहेलोहा पोलीस प्रशासनाने या छुप्या मटका जुगारावर तात्काळ आणि कायमस्वरूपी हातोडा फिरवून मुख्य सूत्रधारांना गजाआड करावेअन्यथा जनतेच्या असंतोषाचा भडका उडाल्या शिवाय राहणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button