Uncategorized

आज जि.प समोर शिक्षक परिषदेचे ढोल बजाओ आंदोलन..

नांदेड प्रतिनिधी:- १५ सप्टेंबर 

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने प्रलंबित असलेले मागण्या सोडविण्यात यावेत अशा प्रकारचे निवेदन ०४ सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी  शिक्षणाधिकारी जिल्हापरिषद नांदेड यांना देऊन निकाली काढण्याची मागणी करण्यात आलेली होती परंतु प्रशासनाने कुठलीही प्रश्न निकाली काढलेले नाहीत म्हणून शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली आज १५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ०१ वाजता जि पप्रशासनाच्या पुढे ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नांदेड आयोजित ढोल बजाओ आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नांदेड जिल्ह्यातील तब्बल १४ शिक्षक संघटनांनी सदरील ढोल बजाव आंदोलनास जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्यातील सर्व बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्ती करण्यासाठी  तसेच आपले जिल्हा परिषदस्तरावरील  प्रलंबित प्रश्नाविषयी प्रशासनाकडे सोडवणूक करून घेण्यासाठी उद्या होणाऱ्या ढोल बजाव आंदोलनास जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधवांनी एकजुटीने हजर राहून प्रशासनास आपल्या मागण्या पूर्णकरून घेण्यासाठीढोल बाजे आंदोलनात सक्रिय उपस्थिती दाखवूनआपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने सर्व शिक्षकांना जाहीर आवाहन जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनींनी अर्ध्या दिवसाची रजा घेऊन  हजारोच्या संख्येने या ढोल बजाओ आंदोलनात आज दुपारी ०१ वाजता जिल्हा परिषदेच्या पुढे  मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड,कार्यवाह प्रल्हाद राठोड आदीनी केला आहे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button