Uncategorized

मुखेडमध्ये अवैध सावकारी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

मुखेड प्रतिनिधी:- १४ सप्टेंबर

तालुक्यातील मौजे दापका राजा येथील एका व्यक्तीने ३ टक्के दराने अवैधरित्या व्याजाने पैसे दिल्या प्रकरणी सहाय्यक अधिकारीसहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

यातील आरोपी मारुती किशन गायकवाड (रादापका राजातामुखेडयाने पीडितास तीन टक्के व्याजदराने १३ हजार ५०० रुपये दिले होतेजवळपास सहा महिने त्यांच्याकडून व्याज वसूल करण्यात आलेया प्रकरणी पीडित व्यक्तीच्या भावाने सहाय्यक निबंधक कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होताशहानिशा केली असता आरोपीने कुठलाही परवाना नसताना व्याजाने रक्कम दिल्याचे आढळून आलेतसेच व्याज वसुलीही केली होती सहाय्यक अधिकारी नारायण श्रीरंगराव होनराव यांनी याप्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिलीत्यावरून मुखेड पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक २१३/२०२५ दाखल केला आहे तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल तेलंग हे करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button