कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

▫️मुखेड काँग्रेसची बांधकाम मंत्र्याकडे तक्रार.
मुखेड प्रतिनिधी:- ०१ जुलै २५
मुखेड शहराच्या चौपदरीकरणाचे काम दीड वर्षापासून रखडले असून कंत्राटदाराने रस्ता खोदूनठेवल्यामुळे अनेक अपघात अनेकांना जीव गमवावे लागत आहे.अशा जोगदंड कन्स्ट्रक्शन कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मुखेड काँग्रेसकडून बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुखेड शहरातून जाणाऱ्या लातूर नरसी राज्य मार्गाचे चौपदरीकरणाचे ३२ कोटी चे काम सुमारे दीडवर्षांपूर्वी पासून चालू झाले आहे.अद्याप पर्यंत काम पूर्ण झाले नसल्याने सदर मार्गावर अनेक गंभीरअपघात होऊन वाहन चालकांना जीव गमवावे लागले आहे.नुकतेच दोन बांधकाम मिस्त्री यांची दुचाकी आणि कारचा गंभीर अपघात होऊन त्यात मृत्यूशी झुंज देत आहेत.त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शिष्ट मंडळप्रदेश सचिव श्रावण रॅपनवाड आणि शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार राजेशजाधव यांची भेट घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटलेआहे की सदर रस्त्याचे खोदकाम करून ठेवणाऱ्या जोगदंड कन्स्ट्रक्शन कंपनीवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,तात्काळ सदर रस्ताकाम सुरू करून लवकर पूर्ण करावे अन्यथा काँग्रेसकडुन पुढील जिवित हानी टाळण्यासाठी आणि सदर कंपनीस धडा शिकवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर तीव्र आक्रमक आंदोलन करण्यात येईल.असे निवेदनातून सांगितले आहे,यानिवेदनावर डॉ.श्रावण रॅपनवाड,शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर सह युवक काँग्रेस शहराध्यक्षजयप्रकाश कानगुले, सेवादल जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर अण्णा साखरे,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष इम्रानपठाण,शहर उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,शहर उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड,युवक काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,जिल्हा युवक काँग्रेस सचिव सुनील पाटील आरगिळे,काँग्रेसचे तालुकासचिव रामेश्वर पाटील इंगोले,युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष एम.आर.गोपनर,अल्पसंख्यांक काँग्रेसता.उपाध्यक्ष शेख मुजीब,इरफान पठाण आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



