Uncategorized

तांदळी येथे युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; बिबट्याच्या हल्याचा संशय

मुखेड प्रतिनिधी :- दि  १७ सप्टेंबर 

मुखेड तालुक्यातील तांदळी येथील जनार्दन उत्तम जाधव (वय ३०यांचा संशयास्पद मृतदेह शेतातीलशेडच्या पत्रावर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहेगळा फोडलेला  शरीरावर बोखरल्याचे जखमा असल्याने हा मृत्यू बिबट्याच्या हल्यामुळे झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कीजनार्दन जाधव काही दिवसांपूर्वी पुणे शहरातून गावी आले होतेदि१५ सप्टेंबर रोजी त्यांनी मुखेड येथे जाऊन भाजीपाला खरेदी केली  सायंकाळी नेहमीप्रमाणे शेतातील पत्र्याच्या झोपडीत झोपण्यासाठी गेले होतेमात्रदुसऱ्या दिवशी दि१६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी त्यांचा रक्तबंबाळ मृतदेह झोपडीच्या पत्रावर आढळून आलाही घटना समजताच गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे  पोलीस उपनिरीक्षक संदीप यमावार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केलीमात्रपरिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने पोलिसांना तपास कार्य अडचणीने करावे लागले.

  या घटनेमुळे तांदळी  परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने तपासकरून बिबट्याच्या उपस्थितीची खात्री करावीअशी ग्रामस्थांची मागणी आहेदरम्यानमृत्यूचे नेमकेकारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button