जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे नवनिर्वाचित सचिव पांडुरंग नागेश्वर यांचा आमदार तुषार राठोड यांच्या हस्ते सत्कार…

मुखेड / प्रतिनिधी ०६ जुलै २५
नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या सचिवपदी मुखेड पंचायत समिती चे ग्राम पंचायत अधिकारी पांडुरंग नागेश्वर यांची नुकतीच बहुमताने निवड झाल्यानंतर त्यांचा मुखेड येथे डॉ तुषार राठोड आमदार यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.
नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये अध्यक्षपदी अशोक कासराळीकर यांची तर उपाध्यक्षपदी रवी क्षिरसागर व सचिव पदी पांडुरंग नागेश्वर नरसीकर यांची बहुमताने निवड करण्यात आली. ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग नागेश्वर यांची पतसंस्थेचे सचिव म्हणून निवड झाल्यामुळे आ. तुषार राठोड यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्राम पंचायत संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष सय्यद नजीर, मा. अध्यक्ष कृष्णा रामदिनवार, सचिव सतीश गायकवाद, हणमंत डावकरे , सचिन पाटील, संजय जाधव , आनंदबिरू , डी वी मांडेवाड , गायक सुरेश वाडकर, संदीप श्रीमंगले , सिद्धेश्वर खेळभडे , निळकंठ गीते, चंद्रकांत देशमुख यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.



