मुखेडला ‘ट्रिगर-१’ दुष्काळ यादीत समाविष्ट करा ; शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु.

उपोषण व धरणे आंदोलणास राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचा जाहीर पाठिंबा.
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : १२ ऑक्टोबर
मुखेड तालुका ‘ट्रिगर-१’ मध्ये दुष्काळ यादीत समाविष्ट करून सरकारने तसा शासन निर्णय जिआर काढावा,या प्रमुख मागणीसह इतर १० मागण्यांसाठी मुखेड तहसील कार्यालयासमोर आंदोलनकर्ते जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर व शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांचे साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाला राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
मुखेड येथील तहसिल कार्यालयाच्या समोर गेल्या सहा दिवसांपासून बेटमोगरेकर व कलबंरकर हे शेतक-यांना सोबत घेवुन साखळी उपोषण व धरणे आंदोलन करत आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे उपोषण पुकारण्यात आले आहे.
या साखळी उपोषण व धरणे आंदोलनाला राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष पत्रकार महेताब शेख यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत मुखेड तालुक्याचा ‘ट्रिगर-१’ मध्ये तात्काळ समावेश करावा अशी मागणी केली आणि या आंदोलनाला राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचा जाहीर पाठिंबा असल्याचे घोषित केले.
याप्रसंगी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे नांदेड जिल्हा सरचिटणीस बबलू मुल्ला उर्फ हसनोद्दीन शेख, मुखेड तालुकाध्यक्ष भाई असद बल्खी,मराठवाडा उपाध्यक्ष गौसअल्ली सलगरकर यांच्यासह परिषदेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


