Uncategorized

सततच्या अतिवृष्टीमुळे नांदेड शहर व जिल्ह्यात हाहाकार; अनेक ठिकाणी पूर परिस्थितीत बचाव कार्यासाठी लष्कराची एक तुकडी लवकरच नांदेडमध्ये दाखल होणार

नांदेड – नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून शुक्रवारी पहाटे पासूनच मुसळधार पाऊस सुरू आहेनांदेड शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहेजिल्हाभरातही एकूणच पूर परिस्थिती पाहता नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पुन्हा एकदा बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण केले आहेलष्कराची ही तुकडी लवकरच नांदेडमध्ये पोहोचणार आहेजिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली आहेविष्णुपुरी प्रकल्पाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

गोदावरी नदी पात्रात ८८ हजार १४३ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान विभागाने नांदेड जिल्ह्याला २९ ऑगस्ट रोजी येलो अलर्ट दिला आहेपहाटेपासूनच मुसळधारपाऊस सुरू आहेया पावसाचा फटका प्रामुख्याने नांदेड शहराला बसल्याचे सध्यातरी चित्र आहे नांदेडशहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहेवसंतनगरबाबानगरमगनपुराराजर्षी शाहूनगरनवामोंढा भागात अनेकांच्या घरात पाणी शिरले आहेविनायकनगर आणि दत्तनगर शारदानगर येथेहीघरामध्ये पाणी शिरले आहेनवीन नांदेडतील सिडकोवसरणीकौठा या भागातही अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहेजुन्या नांदेडातील गंगानगरलूंबिनी नगरविणकर कॉलनीशिवनगर नाल्यालगत असलेल्या घरामध्ये पाणी शिरले आहेनांदेड शहर आणि जिल्हाभरात सुरू असलेल्या या पावसाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळांना आज शुक्रवारी सुट्टी घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.

नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉमहेशकुमार डोईफोडे यांनी सर्व वार्ड ऑफिसरआपत्ती व्यवस्थापन पथक  त्यांचे कर्मचारी फिल्डवर राहतील असे आदेश दिले आहेतआवश्यक्तेनुसार स्थलांतर करण्याचे नियोजन केले आहेअतिवृष्टीमध्ये कामाचे योग्य नियोजनसमन्वय  अंमलबजावणी करण्यासाठी झोननिहाय उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची आयुक्त डोईफोडे यांनी नियुक्ती केली आहेत्यामध्येझोन क्र  साठी निलेश सुंकेवार ९८६०८७२३२० झोन क्र साठी अजितपालसिंघ संधू ९०११०००९६५झोन  साठी सुमंत पाटील ९७६७१७५९९९आणि झोन ,   साठी विकास गाढवे ९७६४२३०६२८यांची नियुक्ती केली आहेहे सर्व अधिकाऱ्यांनी त्या त्या झोनमध्ये आवश्यकता सर्व उपाययोजना तात्काळ करण्याचेही आदेश दिले आहेतनांदेड शहरातील काही भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळीह लविण्यात आले आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागातही पूर परिस्थिती चिंताजनकच आहेमन्याड नदी पूर्ण क्षमतेने वाहत असल्याने मनसकर्गामानूरनंदुरशेवाळा गावालगत पाणी आल्याने नंदुर गावचा संपर्क तुटला आहेया ठिकाणचे ग्रामस्थ उंचावर असल्याने सुरक्षित असल्याचे कळविण्यात आले आहे.

लोहा – गंगाखेड हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला असून वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहेलोहा तालुक्यातील सुनेगाव (कुत्र्याचेया गावाला पुराच्या पाण्याचा वेढाआहेत्यामुळे गावातील नागरिक अडकून पडले आहेतत्यांचा संपर्क तुटला आहेजिल्हा प्रशासनाने याठिकाणी तातडीने बचाव कार्यासाठी मदत पाठवली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button