एकिकडे पूरग्रस्तांचा कहर,तर दुसरीकडे बाईचा नंगा नाच !

मुखेड प्रतिनिधी:- २७ ऑगस्ट
मुखेड तालुक्यातील लेंडी धरणग्रस्त गावांवर बॅक वॉटरच्या पुरामुळे अस्मानी संकट ओढवले असूनहासनाळ गावांत सहा माणसे मृत्युमुखी तर मुक्रामाबाद येथे एकाच व्यक्तीचे ४० जनावरे मृत्युमुखी असेपूरग्रस्त गावात कितीतरी शेकडो जनावरे दगावली आहेत.

रावणगाव , हासनाळ , भिंगोली, भेंडेगाव , मारजवाडी मुक्रामाबाद, रावी, सह इतर अनेक पूरग्रस्त गावांतअनेकांची संसार अक्षरशः उद्धवस्त झाल्याने एकिकडे हजारो गोरगरिब जनता मदतीसाठी टाहो.. फोडीतअसताना दुसरीकडे मात्र मुखेडला लागून जवळच असलेल्या देगलूर शहरात दहीहंडी उत्सवाच्यानावाखाली बाया नाचवण्याचे काम केल्याने राजकीय पुढार्यांतली माणुसकी कुठे गेली ? असा सवालआता जनतेतुन विचारला जात आहे.
सण उत्सव साजरा करणे ही आपली भारतीय संस्कृती असली तरी एकीकडे महाराष्ट्रात आपल्याजिल्ह्यावर पूर परिस्थितीचे महाभयंकर संकट ओढवले असताना दुसरीकडे मात्र पवित्र अशा दहीहंडीच्यानावाखाली लाखो रुपये खर्च करून बाईचा नंगा नाच लावणे हे कितपत योग्य आहे.

बाया नाचवण्या इतक्या खर्चात जर पूरग्रस्तांना मदत केली असती तर माणसातल्या माणुसकीचे दर्शनघडले असते हे खरे नाही का ? अजुनही काही ठिकाणी माणुसकी जिवंत आहे.
पूरग्रस्तांना मदत करणारेही, काही सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, गणेश मंडळ व दहीहंडी मंडळेदिसले त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
दुसरीकडे बाईचा नंगानाच लावलेला पाहून मनाला कुठेतरी वेदना होऊन खेद वाटतो.
तर दुसरीकडे पूरग्रस्तांच्या कहर ..कडे पाठ फिरवून बाईचा नंगा नाच लावून बघत बसणे हे राजकीयपुढार्यांना कितपत शोभते हे ज्याचे त्यांनी विचार करावा एवढेच या बातमी मागचा उदेश आहे .



