Uncategorized

जि.प.मुलींचे हायस्कूलच्या २५० विद्यार्थ्यांना मोफत कंपासपेटी.

मुखेड / प्रतिनिधी.

जि.प.शाळेचे माजी विद्यार्थी तथा नांदेड महानगरपालिकेचे टाऊन प्लॅन इंजिनियर स्व.परमेश्वर तोटरे यांच्या स्मरणार्थ तोटरे परिवाराच्या वतीने रमेशराव तोटरे आणि कुं. अकिंता रमेश तोटरे यांच्या हस्ते पिएमश्री,जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड या प्रशालेतील तब्बल २५० विद्यार्थीनिंना मोफत कंपास पेटी वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांच्या शैक्षनिक विकासासाठी पुढाकार घेतला. तोटरे परिवाराच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

 यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख उत्तम चव्हान,मुख्याध्यापक डी.जे. कांबळे,सांस्कृतिक विभागप्रमुख दिलीपराव देवकांबळे,शिक्षक संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष दिपक लोहबंदे,सहशिक्षक एस.बी.राजपुत,विश्वांभर जाधव, बळीराम मुद्देवाड,मधुमती लोणीकर,डॉ.बरकतउल्ला,अंबादास देशमुख,सुनिता आलमले, गंगाधर अनकडे,नागनाथ स्वामी, ए.के.जाधव,सुधीर शृंगारे, राहुलकूमार मेहरकर,कल्याण इंगळे,श्यामसुंदर दारकु,बालाजी गोंड,बळीराम दुरनाळे,चंद्रकांत डावकरे,हरी भालेराव,आशालता स्वामी,हरिदास पवार,पंढरी भालेराव,संगिता धनशेट्टी,सुरेखा हराळे,शिला उबाळे,सरस्वती मुपडे,सुनिता पाटील,रेखा दिनकर,संगीता माळगे,अनुपमा टाकळीकर,व्यंकटी केंद्रे,प्रकाश डोईजड,दिपाली बारहात्ते, नागसेना येवतीकर,एम.एच. गवते,अनिता साळुंखे,गंगामणी शेटकार,रंजना कदम,शाहेदाबी ताबोंळी,लुमावती गडगिळे, फय्युमद्दीन पटेल,राजकोर कांबळे,जिवन वडजे,अकबर सय्यद,भवानिसींह चौहान,प्रशांत पवार,हरीबाइ केळे,अवधुत गीरी सह सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी,तोटरे परिवारातील सदस्य व विद्यार्थी  उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button