सावधान ‘थर्टी फर्स्ट’ला धिंगाणा घालाल, तर ‘हॅप्पी न्यू इयर’ कोठडीत होणार !

◽️यंदा निवडनूकांमुळे थर्टी फर्स्ट जंगी होणार
मुखेड (प्रतिनिधी) बल्खी आसद
३० डिसेंबर २५
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या जल्लोषाला गालबोट लागू नये, यासाठी नांदेड जिल्हा पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांवर आणि भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांची रवानगी थेट कोठडीत केली जाईल, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.
नगरपालिका निवडणुकांचा हंगाम नुकताच संपल्याने राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. त्यामुळे यंदाचा ‘थर्टी फर्स्ट‘ अधिक जंगी होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन शहराच्या चारही कोपऱ्यांवर कडक नाकाबंदी करण्यात येणार आहे. विशेषतः हॉटेल, ढाबे आणि शहराबाहेरील रस्त्यांवर गस्त वाढवण्यात येणार आहे.
या विनापरवाना पार्ट्या व जल्लोषावर पोलीस तसेच अन्न आणि औषध प्रशासनाची (एफडीए) करडीनजर असणार आहे. एफडीएचे अधिकारी व पोलीस या कारवाईत सहभागी होणार असल्याची माहितीआहे.
तालुक्यांत मावळत्या वर्षाचा जल्लोष व येणाऱ्या वर्षाचे स्वागत म्हणून मोठ्या संख्येत पार्ट्या होतात. पार्ट्या मध्ये तरुणाई राहते. सध्या सोशल मीडियावर नववर्षाच्या स्वागताच्या तयारीबाबत चर्चा सुरूझाली आहे. तरुणाईकडून हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पार्ट्या चे नियोजन केले जात आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण परिसरातील हॉटेल्स सजणे सुरू झाले आहेत, मोठ्या हॉटेलपासून साध्या हॉटेल्स आकर्षक रोषणाई केली जात आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही हॉटेल चालकांनीडीजे, लाइव्ह गाण्यांचे शो आयोजित केले आहेत. हॉटेलमध्ये कॉलेजचे विद्यार्थी, आयटी मध्ये कामकरणाऱ्या तरुण–तरुणी फोन करून विविध ऑफर्सची माहिती घेत आहेत, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्सने मेन्यूवर सवलती व विशेष पॅकेजची व्यवस्था केली आहे.
तरुण–तरुणींना विशेष सवलत दिली जात आहे. या पार्ध्यावर अन्न आणि औषध प्रशासनाची करडीनजर असणार आहे. फूड सेफ्टी ऑफिसरकडून हॉटेल्सची तपासणी केली जाणार असून, अन्नपदार्थाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. कमी दर्जाचे, बनावट आणि असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास त्या हॉटेल चालकांवर कारवाई केली जाणार आहे. धागडधिंगा करणाऱ्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जेलची हवा खावी लागू शकते.
अनेक जण नववर्षाच्या जय्यत तयारीलाही लागले आहेत. अनेकांनी हॉटेल, ढाबे बुकिंगही केले आहेत, तर अनेकांनी मोकळ्या मैदानात, सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक लावून नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या जागेत पार्टी करण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक आहे.



