Uncategorized

नगराध्यक्ष अन नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर; मुखेड नगराध्यक्षपद खुला महिला प्रवर्गासाठी 

मुखेड प्रतिनिधी:- दि.०६ ऑक्टोंबर 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी मोठी राजकीय घडामोड झाली आहे. राज्यातील २४७ नगरपालिका  आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण बुधवारी  जाहीरकरण्यात आले आहे. नगरविकास विभागाच्या वतीने ही आरक्षण सोडत काढण्यात आली, ज्यात अनेकमहत्त्वपूर्ण शहरांमध्ये महिलांसाठी नगराध्यक्षपद आरक्षित झाले आहे.

मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षते खाली ही सोडत प्रक्रिया पार पडली. यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आरक्षणामुळे अनेक विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांना आता पुढील राजकीय वाटचाल निश्चित करावी लागणार आहे. आरक्षण सोडतीनुसार, नगराध्यक्षपदासाठी विविध प्रवर्गातील महिलांसाठी जागा आरक्षित झाल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक राजकारणात महिलांचा सहभाग वाढणार आहे.


मोहाडी, बार्शी टाकळी, वाशी, नाडगाव, गुहागर, राळेगाव, लाखादूर, वैराग, सोयगाव, महादूला, अनगर, कडेगाव, पेठ, पाटण, औंढा नागनाथ, लाखणी, रेणापूर, नातेपुते, महसला, सडक अर्जुनी, दिडोरी, जळकोट, मेढा, लोणंद, वाडा, देवरुख, लांजा, शिंदखेडा, मंडणगड, तिवसा, वडगाव मावळ, पारशिवणी, शहापूर, देहू, कुही, मुक्ताई नगर, बाभुळगाव.

यामध्ये परळी वैजनाथ, मुखेड, आंबरनाथ, अचलपूर, मुदखेड, पवनी, कन्नड, मलकापूर (कोल्हापूर), मोवाड, पंढरपूर, खामगाव, गंगाखेड, धरणगाव, बार्शी, अंबड, गेवराई, म्हसवड, गडचिरोली, भंडारा, उरण, बुलढाणा, पैठण, कारंजा, नांदुरा, सावनेर, मंगळवेढा, कळमनुरी, आर्वी, किनवट, कागल, संगमनेर, मुरगूड, साकोली, कुरुंदवाड, पूर्णा, कळंब, चांदुररेल्वे, चांदुरबाजार, भूम, रत्नागिरी, रहिमतपूर, खेड, करमाळा, वसमत, हिंगणघाट, रावेर, जामनेर, पलूस, यावल, सावंतवाडी, जव्हार, तासगाव, राजापूर, सिंदिरेल्वे, जामखेड, चाकण, शेवगाव, लोणार, हदगांव, पन्हाळा, धर्माबाद, उमरखेड, मानवत, पाचोरा, पेण, फैजपूर, उदगीर, अलिबाग या प्रमुख शहरांचा समावेश आहे.

 यामध्ये देऊळ गावराजा, मोहोळ, तेल्हारा, ओझर, वानडोंगरी, भुसावळ, घुग्गूस, चिमूर, शिर्डी, सावदा, मैनदर्गी, दिगडोहदेवी, दिग्रस, अकलूज, बीड, शिरोळ या नगरपरिषदांचा समावेश आहे.

 यात भगूर, इगतपुरी, विटा, बल्हारपूर, धाराशिव, भोकरदन, जुन्नर, उमरेड, दौंड, कुळगाव बदलापूर, हिंगोली, फुलगाव, मुरुड जंजीरा, शिरूर, काटोल, माजलगाव, मूल, मालवण, देसाईगंज, हिवरखेड, अकोट, मोर्शी, नेर–नवाबपूर, औसा, कर्जत, देगलूर, चोपडा, सटाणा, दोंडाईचा वरवडे, बाळापूर, रोहा, कुरडुवादी, धामणगाव रेल्वे, वरोरा या नगरपरिषदांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button