मुखेड नगरपरिषदेच्या १० प्रभागातील २० जागांसाठी आरक्षण जाहीर

▫️५ जागा ना.मा.प्र., ३ जागा अनुसूचित जाती, २ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित १० जागा खुल्याप्रवर्गासाठी
मुखेड : नगरपरिषदेच्या दहा प्रभागातून प्रत्येकी दोन असे वीस नगरसेवक निवडून देण्यासाठीचेनगरसेवक पदाचे आरक्षण उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक अनुप पाटील यांच्या अध्यक्षतेखालीआणि तहसीलदार तथा मुख्याधिकारी राजेश जाधव यांच्याप्रमुख उपस्थितीत आज जाहीर करण्यातआले. नगरपरिषदेच्या सभागृहात २० जागांसाठी सोडतीद्वारे आरक्षण काढण्यात आले आहे.
▫️प्रवर्गनिहाय आरक्षण खालील प्रमाणे
खुली महिला ४, खुला ६, अनुसूचित जाती महिला २अनुसूचित जाती १, अनुसूचित जमाती महिला १, अनुसूचित जमाती१, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग २, असे एकूण २०जागेसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. प्रभाग क्रमांक १अ मा. प्र.१ब खुला महिलाप्रभाग क्रमांक २अ अनु. जा. महिला २ब खुला, प्रभाग क्रमांक ३अ अनु. जाती ३ब खुला महिला, प्रभागक्रमांक ४अना.मा. प्र. महिला, ४ ब खुला प्रभाग क्रमांक ५अ – अनु.जा. महिला, ५ब खुला प्रभाग क्रमांक६अ अनु. जमा. महिला, ६ब खुला प्रभाग क्रमांक ७अ अनु. जमाती, ७ ब खुला महिला प्रभाग क्रमांक८अ–ना. मा. प्र. महिला, ८ब खुला प्रभाग क्रमांक ९अ ना.मा.प्र.९ब खुला महिला प्रभाग क्रमांक १०अना.मा.प्र. महिला, १०ब–खुला आज काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत वीस पैकी दहा जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले असून पाच जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीवठेवण्यात आले आहेत तर ३ जागा अनुसूचित जाती साठी आरक्षित करण्यात आले आहेत. २ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.
शहरातील एकूण दहा प्रभागातील २० जागांसाठी आरक्षण सोडत करण्यात आली असून प्रत्येक प्रभागातएक जागा खुल्या प्रवर्गासाठी तर एक जागा प्रवर्गनिहाय ना. मा. प्र., अनु. जाती, अनु. जमाती साठीआरक्षित करण्यात आली आहे. आरक्षण सोडती वेळी विविध पक्षांचे व संघटनेचे पदाधिकारी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




