मुखेड तालुका खरेदी-विक्री संघ निवडणूक: विविध गटांतून ८ संचालक बिनविरोध!

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: २३ सप्टेंबर २६
मुखेड तालुका खरेदी–विक्री संघ मर्यादित, मुखेड संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२६–२०३१ अंतर्गत विविध सहकारी संस्था गटांतून ८ जागांवर उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी अनिल चव्हाण यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम २०१४ च्या नियम ३२नुसार या निवडीची अधिकृत घोषणा केली. या निवडणुकीत संबंधित मतदारसंघांत प्रत्येकी एकच अर्ज आल्याने मुखेड सहकारी संस्था गटातून दिगांबर सुभाषराव गोपनर (रा. आखरगा, पो. होनवडज), बेटमोगरा गटातून दत्ता रामचंद्र पाटील (रा. बेटमोगरा), एकलारा गटातून माधवराव तुकाराम वडजे (रा. उंद्री प.दे.), सावरगाव (पि.) गटातून विजयकुमार त्र्यंबकराव मस्केले (रा. सांगवी बेनक), पाळा गटातून आनंदराव हरिश्चंद्र शिंदे (रा. केरूर), राजुरा गटातून अनुराधा गोविंदराव कदम (रा. माकणी), बाऱ्हाळीगटातून व्यंकटराव गोविंदराव उमाटे (रा. बाऱ्हाळी) आणि मुक्रामाबाद सहकारी संस्था गटातून व्यंकटराव तुकाराम वाडीकर (रा. हाळणी) यांची व्यवस्थापन समितीवर अविरोध निवड घोषित करण्यात आली असून, नवनिर्वाचित संचालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



