Uncategorized

राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषदेची आढावा बैठक संपन्न

युवा जिल्हाध्यक्षपदी जलील पठाण यांची निवड

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषदेची आढावा बैठक संपन्न झाली. या आढावा बैठकीमध्ये अल्पसंख्यांक समाजातील शिक्षण, संरक्षण व आरक्षण या विषयावर महत्त्वपूर्ण अशी सखोल चर्चा करण्यात आली. यानंतर राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषदेच्या युवा जिल्हा अध्यक्षपदी मुक्रमाबाद येथील जलील पठाण यांची नियुक्ती करण्यात आली. तर तालुका सचिव पदी शफी कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली. या आढावा बैठकीत राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष अब्दुल बशीर माजीद तथा मराठवाडा सदस्य प्राध्यापक जुबेर खान व मराठवाडा सदस्य मोईन कुरेशी व जिल्हाध्यक्ष मेहताब शेख तथा तालुकाध्यक्ष आसद बल्खी व एपीजे अब्दुल कलाम सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष एस. के. बबलू व राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषदेचे मुखेड युवा शहराध्यक्ष इम्रान अत्तार ,कदीर शेख यांची उपस्थिती होती. तर या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष सय्यद जलालोद्दीन व धर्मगुरु हाफीज रहेमतुल्ला, पत्रकार शाकीर काझी, रज्जाक कुरेशी, अशोक लोणीकर, रफी शेख, बाबा पठाण ,जावेद शेख, साजिद शेख, अलीम शेख, सोहेल शेख ,बाबा शेख, मेहबूब शेख, इरशाद शेख,मोहसिन पठाण इत्यादी जणांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button