राजकीय

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका सचिव पदी कॉ.गंगाधर गायकवाड यांची फेर निवड 

नांदेड प्रतिनिधी:-

नांदेड  : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे  वे त्रेवार्षिक तालुका अधिवेशन गांधी नगर येथे दि. जानेवारी रोजीमोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या अधिवेशनास पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य तथा जेष्ठ कामगार नेते कॉ.विजय गाभने यांची प्रमुखउपस्थिती होती.

कामगार नेते  पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य कॉ.गंगाधर गायकवाड यांची फेर निवड या अधिवेशनातएकमताने करण्यात आली.

पहिल्या सत्राच्या सुरवातीला पश्चिम बंगाल चे माजी मुख्यमंत्री दिवंगत कॉ.बुद्धदेव भट्टाचार्यमाकपचेराष्टीय महासचिव कॉ.सीताराम येचूरी तसेच किनवट माहूर मतदार संघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचेसह परभणी दंगलीतील शहीदाना  ज्ञात,अज्ञात चळवळीतील कालवश लोकांना शोक सभा घेऊनश्रद्धांजली वाहण्यात आली.

कॉ.विजय गाभने यांनी अधिवेशनास संबोधित केले तर पक्षाच्या जिल्हा सचिव मंडळ सदस्या कॉ.उज्वलापडलवार यांनी प्रस्ताविक केले.सूत्रसंचालन कॉ.श्याम सरोदे यांनी केले 

या अधिवेशनात तालुका कमिटी सदस्य म्हणून कॉ.उज्वला पडलवार,कॉ.अरुण दगडूकॉकरवंदागायकवाडकॉ.मीना आरसेकॉ.लता गायकवाडकॉश्याम सरोदेकॉ.बंटी वाघमारेकॉजयराजगायकवाडकॉ.रमेश गायकवाडकॉ.प्रफुल्ल कऊडकर आदींची निवड करण्यात आली.ही तालुका कमिटीपुढील तीन वर्षासाठी कामकाज पहाणार आहे.

सदरील अधिवेशनात नांदेड शहरासह वाघीवानेगाव,बोरगाव,कोंढासोमेश्वरवानेगाव येथील पक्षसभासदांनी सहभागी झाले होते.

अधिवेशनाचा समारोप कॉ.अरुण दगडू यांनी केला तर आभार कॉबंटी वाघमारे यांनी मानलेअधिवेशनयशस्वी करण्यासाठी कॉसंगीता गाभनेकॉ.प्रदीप महाजन,कॉ.पवन जगडमवारकॉबालाजी पाटीलभोसलेकॉ.नेहा कऊडकरकॉ.मंगेश वाट्टेवाड,कॉपंढरी बरुडे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button