रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कबरस्तानची स्वच्छता करा; भाई आसद बल्खी यांची नगर परिषदेकडे मागणी”

मुखेड : पवित्र रमजान महिन्याचा शेवट आणि ईदुल फितरचा सण जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक कबरस्तानची तातडीने स्वच्छता करण्यात यावी, अशी आग्रही मागणी शेकाप राज्य मध्यवर्ती समिती सदस्य भाई आसद बल्खी यांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे.
रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी वत्यांच्यासाठी प्रार्थना (दुआ) करण्यासाठी कबरस्तानमध्ये जातात. मात्र, सध्या अनेक ठिकाणच्याकबरस्तानमध्ये लाईट नसल्याने व मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांना तिथे वावरताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
स्वच्छता आणि सोयी-सुविधांकडे लक्ष देण्याची गरज या संदर्भात बोलताना भाई आसद बल्खी म्हणाले की, “ईद हा आनंदाचा आणि पवित्र सण आहे. या दिवशी कबरस्तानमध्ये येणाऱ्या श्रद्धाळूंची संख्यामोठी असते. त्यामुळे नगर परिषदेने वेळेपूर्वीच संपूर्ण परिसराची स्वच्छता करावी, पिण्याच्या पाण्याचीसोय करावी आणि रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशव्यवस्थेसाठी नवीन पथदिव्य बसवण्यात यावे व दुरुस्तीकरावी.”
वाढलेल्या झुडपांमुळे कीटक आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वाढू शकतो, ही बाब लक्षात घेऊनयुद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे. प्रशासनाने यामागणीकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो
नगर परिषद प्रशासनाने संबंधित विभागाला निर्देश देऊन कबरस्तान परिसरातील झाडांची तात्काळछाटणी करावी तसेच संपूर्ण परिसराची स्वच्छता मोहीम राबवावी लाईट ची व्यवस्था करावी , अशी मागणी भाई आसद बल्खी यांनी केली आहे. या कामामुळे कबरस्तानात येणाऱ्या नागरिकांना कोणतीहीअडचण निर्माण होणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
या वेळी निवेदन देताना भाई आसद बल्खी,भाई पांडुरंग लंगेवाड ,रऊफ मुल्ला,यासिर अराफत आदी उपस्थित होते
या मागणीमुळे आता नगर परिषद प्रशासन नेमकी काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



