सामाजिक

लातूर रोड-जळकोट-मुखेड-बिलोली-बोधन रेल्वेचा प्रश्न ऐरणीवर; विधिमंडळात आवाज उठवण्याची आमदारांकडून अपेक्षा

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड १५ जुलै २६ : 

लातूर रोडजळकोटमुखेडबिलोलीबोधन या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाची मागणी आता पुन्हा एकदा जोरधरत आहेपरिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रेल्वेचा प्रश्न आगामी विधिमंडळअधिवेशनात उपस्थित केला जावाअशी तीव्र अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मुखेड तालुक्यातील धर्तीवर आता या मार्गाच्या मागणीने व्यापक चळवळीचे रूप घेतल्याचे स्पष्ट होतआहे.

या मोहिमेअंतर्गत रेल्वे मार्गाचे महत्त्व आणि त्याचे फायदे ठळकपणे मांडण्यात आले आहेतयामध्येप्रामुख्याने हा केवळ एक प्रवास मार्ग नसून परिसरातील अनेक तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा एक अत्यंतमहत्त्वपूर्ण रेल्वे मार्ग ठरणार आहे.

इतर पर्यायी मार्गांच्या तुलनेत शासनाला हा मार्ग कमी खर्चिक असणार आहेत्यामुळे या प्रकल्पालातातडीने मंजुरी मिळणे सोयीचे ठरू शकते.

 या रेल्वे सेवेमुळे लातूर रोडजळकोटमुखेडबिलोली आणि बोधन या संपूर्ण पट्ट्यातील व्यापारपर्यटनआणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊन स्थानिक अर्थकारणाला मोठी चालना मिळेल.

या प्रलंबित प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची नितांत गरजआहेआमदार डॉतुषार राठोडआमदार संजय बनसोडे आणि आमदार जितेश अंतापूरकर यांनी या प्रश्नीलक्ष घालून विधिमंडळात यावर सविस्तर चर्चा घडवून आणावी आणि शासनाकडून हा मार्ग मंजूर करूनघ्यावाअशी साद या मोहिमेद्वारे घालण्यात आली आहे.

“विकासासाठी रेल्वे आवश्यक! आमची मागणी – रेल्वे द्या, विकास घडवा!” या जोरदार घोषणेसह हीमागणी आता शासन दरबारी पुढे रेटली जात आहेआता या जनभावनेला लोकप्रतिनिधी आणि शासनसकारात्मक प्रतिसाद देऊन या भागाचा रेल्वेचा वनवास संपवणार कायाकडे संपूर्ण परिसराचे लक्षलागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button