भटक्या विमुक्तांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागकटिबद्ध :- सचिन खुणे

▫️विविध उपक्रमाच्या आयोजनाने भटके विमुक्त दिवस साजरा
मुखेड प्रतिनिधी:- १ सप्टेंबर
भटक्या विमुक्तांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे उत्तरदायित्व आणि कटिबद्धता इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि आश्रम शाळा शिक्षकांच्या खांद्यावर असल्याचे प्रतिपादन या विभागाचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी केले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय नांदेड आणि विमुक्त जाती सेवा समिती शैक्षणिक संकुलाच्या संयुक्त विद्यमाने भटके विमुक्त दिवसाचे औचित्य साधून एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष पदावरून सचिन खुणे बोलत होते. या कार्यक्रमास इतर मागास बहुजनकल्याण अधिकारी श्री उमेश मोरे, प्रसिद्ध वक्ते तथा प्रा. डॉ. रामकृष्ण बदने, प्रा. डॉ. देविदास पवार, सेवानिवृत्त राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श मुख्याध्यापक गोविंदराव चव्हाण, प्राचार्य भगवान मरकटवाड, प्राचार्य सोपानराव वाघमारे, मुख्याध्यापक गोविंद पवार, मुख्याध्यापक संदीप गेटकेवार, मुख्याध्यापक संदीप परकंठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना सहाय्यक संचालक सचिन खुणे पुढे म्हणाले की, इतर मागास बहुजन कल्याणविभागाच्या वतीने यावर्षीपासून 31 ऑगस्ट रोजी भटके मुक्त दिवस साजरा करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आज हा दिवस आपण मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करीत आहोत.भटक्या विमुक्तांच्या उत्थानासाठी आणि उत्कर्षासाठी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. आपला विभाग अत्यंत सजगतेने आणि कार्यक्षमपणे कार्यरत असून विभागाच्या वतीने नाविन्यपूर्ण असे वेगवेगळे उपक्रम भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी राबवित आहे. तरीही परंतु भटक्या विमुक्तांचा विकास ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने झालेला नाही यासाठी भटक्या विमुक्तांना समाजाच्या आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची सर्वस्वी जबाबदारी इतर मागास बहुजन कल्याण विभागाची आणि या विभागामार्फत चालणाऱ्या आश्रम शाळातील प्राध्यापक – शिक्षकांची असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

भटका विमुक्त दिवस साजरा करण्यामागची शासनाची भूमिका आणि पार्श्वभूमी त्यांनी यावेळी सविस्तरपणे विशद केली.
यावेळी बोलताना प्रा.डाॅ.रामकृष्ण बदने म्हणाले की गावकुसाबाहेर भटकण्याचे काम भटक्यांना करावे लागत आहे.आज ही अनेक भटक्यांना रहीवासी प्रमाणपत्र मिळत नाही.त्या मुळे जातीचे प्रमाणपत्र काढता येत नाही.हे भटके अनेक योजनांपासून दुर राहतात.ब–यांच जणांना आधार कार्ड मिळत नाहीत या साठी शासन स्तरावर प्रयत्न होणे महत्वाचे आहे.आजचा दिवस स्वाभिमान दिवस म्हणून पाळला पाहिजे.
प्रा. डॉ. देविदास पवार म्हणाले की इंग्रजांनी जो १८७१ गुन्हेगारी जमात कायदा केला त्या विरूध्द अनेक लढे लढले गेले व याच दिवसी म्हणजे ३१ ऑगस्ट १९५२ ला या कायद्यातुन भटके विमुक्त मुक्त झाले.भटक्यांच्या उन्नतीसाठी अनेकांनी प्रयत्न केले त्यात कै.वसंतराव नाईक,कर्मवीर किशनराव राठोड साहेब,दलितमित्र गोविंदराव राठोड यांचे मोलाचे योगदान राहीले आहे.त्यांनी या वेळी भटक्या विमुक्तांचा इतिहास– सद्यस्थिती आणि भविष्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन आपल्या भाषणातून केले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्वागत गीताने श्री वीरभद्र मठपती आणि संगीत संचाने केले. संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
प्रारंभी सहाय्यक संचालक सचिन खुणे आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी श्री उमेश मोरेयांचे बंजारा महिला आणि मुलींनी पारंपारिक पद्धतीने स्वागत केले . यावेळी प्रमुख अधिकारी आणि आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते आश्रम शाळा प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
सकाळच्या सत्रात भटके विमुक्त दिवसाच्या निमित्ताने निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. तर दुपारच्या सत्रात भटक्या विमुक्त दिवसाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या तीनही स्पर्धांमध्ये प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी, विद्यानिकेतन पब्लिक स्कूल कमळेवाडी, प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वसंत नगर या शाळांमधीलविद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
तीनही स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना मान्यवर अधिकाऱ्यांच्या आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिकवितरण करण्यात आले.
निबंध स्पर्धेमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळांनी बाजी मारली तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये विद्यानिकेतनच्या अमोल लक्ष्मण राठोड यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर सांस्कृतिक नृत्य स्पर्धेमध्ये माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडीच्या स्पर्धकाने प्रथम क्रमांक मिळविला.
भटके विमुक्त दिवस साजरा करण्यासाठी प्राचार्य भगवान मरकटवाड, प्राचार्य सोपानराव वाघमारे, मुख्याध्यापक गोविंदराव पवार, मुख्याध्यापक संदीप गेटकेवार, मुख्याध्यापक संदीप परकंठे, इतरमागास बहुजन कल्याण कार्यालयाचे श्री महेश इंगेवाड, श्री माने,वरिष्ठ लिपिक मारोती मेहरकर, नामदेवशिंदे, राम राठोड, प्रा. माधव कदम,
प्रा. राजकुमार यलावाड, राजकुमार मेहेरकर, संजय राठोड, संगम मठपती, अंकुश गायकवाड, विजयपेंडकर,वीरभद्र मठपती, प्राध्यापक बालाजी जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भगवान मरकटवाड यांनी केले. सूत्रसंचालन रमेश डावकरे यांनी तरआभार गजानन गेडेवाड यांनी मानले. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास भटक्याविमुक्त भगिनी, समाज बांधव शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



