Uncategorized

क्रांतीज्योती सावित्रीमाईंचा काव्य जागर…!

भारतीय महिलांच्या कर्तबगारीचा जेंव्हा जेंव्हा उल्लेख केला जातो तेंव्हा तेंव्हा सावित्रीमाई फुले यांचे नाव अग्रस्थानी घेतल्या जातेभारतीय इतिहासात ज्यांची सुवर्णाक्षरांनी विशेष नोंद घेतली आहेअशा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा आज जन्मदिन.

सावित्रीमाई फुले आणि स्त्री शिक्षण हे एकाचनाण्याच्या दोन बाजू आहेतमहात्मा जोतीबा फुलेंनी एका बाजूने सामाजिक परिवर्तनाची लढाई लढत असताना दुसऱ्या बाजुला त्यांच्या सुविद्य पत्नी सावित्रीमाई फुले महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावूनस्त्री शिक्षणाची धगधगती क्रांतीकारी मशाल हाती घेऊन आपले ऐतिहासिक कार्य पुढे नेटाने चालविलेजिच्या हातात फक्त पाळण्याची दोरी होती त्या हातात राष्ट्रध्वज फडकविण्याची दोरी येईपर्यंतचा थक्क करणारा प्रवास रोमहर्षक आणि प्रेरणादायी आहे.

सावित्रीमाई फुले फक्त स्त्रियांच्या शिक्षणापुरते आपले कार्य मर्यादीत  ठेवता अनेक समाजोपयोगी कार्यात विधायक आणि सृजनात्मक क्षेत्रातही आपली छाप पाडली आहेसावित्रीमाई फुले यांचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्ये म्हणजे त्या उत्तम प्रकारच्या कवयित्री होत्यात्यांनी स्त्रियांच्या शैक्षणिक प्रश्नावरकार्य करीत असताना आलेले दाहक अनुभव त्यांच्या काव्य रचनेतून दिसून येतेत्यांनी समाज जागृती करीता काव्य जागरच्या माध्यमातून कार्य करुन एका दृष्टीने वाङ्‌मय क्षेत्राला देखील खऱ्याअर्थाने अधिक समृद्ध करण्यात आपले उचित असे योगदान दिले आहेसावित्रीमाई फुले यांनीकाव्यफुले‘ (1854) आणि ‘बावनकशी सुबोध रत्नाकार‘ या दोन प्रमुख काव्य संग्रहाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा स्त्री शिक्षण आणि शिक्षणाचे महत्त्व यावर प्रबोधनात्मक काव्यांची निर्मिती केलीज्यामध्ये त्यांनी इंग्रजी आईच्या आगमनाचे स्वागत करीत शुद्र आणि स्त्रीयांच्या मुक्तीसाठी शिक्षणाला अत्यावश्यक मानले आणि ‘ज्ञान हेच खरे धन‘ आहे असे मौलिक विचार त्यांनी तळागाळापर्यंतपोहोचविलेसावित्रीमाईच्या

कवितांची काही ठळक वैशिष्ट्येत्यांचा विचार जर केला तर असे स्पष्ट जाणवते कीशिक्षणानेच अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि प्रगती साधता येतेज्ञान हे धन यासारख्या कवितेतून शिक्षणाचे उत्तमप्रकारे बिजारोपण त्यांनी काव्यपंक्तीतून मांडले आहेज्यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी आणि समाजातील दुर्बल घटकांच्या उद्धारासाठी आवाज उठविला इंग्रजी आईच्या आगमनामुळे मनुच्या शिकवणीतून सुटका होईल असे त्यांचे ठाम मत होतेज्या काळात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धारुढीपरंपरा आणि प्रस्थापित व्यवस्थेवर त्यांनी आपल्या कवितांमधून एकच ‘हल्लाबोल‘ केला. १८५४ मध्येप्रकाशित झालेला ‘काव्यफुले‘ या कविता संग्रहात एकुण एकेचाळीस कविता आहेततर बावनकशीसुबोधरत्नाकार या कविता संग्रहात जोतीराव फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या दिशादर्शक कविता आहेतज्या रचना तत्कालीन परिस्थितीत वैचारिक वादळ निर्माण करण्याचे कार्य केले आहेखर्या अर्थाने सावित्रीमाई फुलेंना भारतातील पहिल्या आधुनिक कवयित्री मानल्या जातेत्यांच्या कविता आजही शिक्षणसमानता आणि सामाजिक न्यायासाठी नवपिढीला प्रेरणा देणाऱ्या आहेतशिक्षणाचे महत्त्व विशद करताना सावित्रीमाई लिहितात, ‘जर तुमच्याकडे ज्ञान नसेलशिक्षण नसेल आणि तुम्हालाही तेच हवे आहे असे वाटत नाही तुमच्याकडे बुद्धी आहेपण तुम्ही त्यावर काम करत नाही मग तुम्हाला माणूस कसे म्हणता येईल?’

अर्थातच ज्ञानाशिवाय तुम्ही माणूस म्हणून खऱ्या अर्थाने परिपूर्ण नाहीतहे त्यांनी सदर रचनेतून अधोरेखित केले आहेयाच कवितेत पुढे मांडतात पक्षीप्राणीमाकडेमाणसे देखील सर्व जण जन्मआणि मृत्यूमधून जातात पण जर तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नसेल मग तुम्हाला माणूस कसे म्हणता येईलएकुणच निसर्गमानवी जीवनातील स्थित्यंतरे आणि वैशिष्ट्यपूर्ण कंगोरे याची जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही माणूस जन्म म्हणून माणसास ‘माणूस‘ कसे म्हणता येईलअसा सवाल मांडून त्याचे उत्तर देखील त्यांनी आपल्या रचनेतून दिले आहेते असे ज्ञान ही संपत्ती आहे सर्व संपत्ती पेक्षा श्रेष्ठ तो शहाणा मानला जातो ते कोण मिळवते?

सदर रचनेतून आर्थिक संपत्तीपेक्षा ज्ञानाचे भांडार आपल्याकडे असावे असे सावित्रीमाईंनी या रचनेतून अगदी सहज साध्या आणि सोप्या शब्दांमधून मांडतातजे सर्वसामान्य वाचकाला देखील भुरळ घालते आणि त्यातून तो प्रेरित होतोस्वावलंबनाला तुमचा व्यवसाय बनवा ज्ञानाची संपत्ती गोळा करण्यासाठी स्वतःला झोकुन द्या ज्ञानाशिवाय प्राणी मुके राहिले आराम करु नकास्वतःला शिक्षीत करण्याचा प्रयत्नकरा स्वावलंबनज्ञानपिपासू हे गुणग्राहक होऊन सजग व्हावाप्राणी ज्ञानामुळे मुके राहिले आणि जर तुम्ही ज्ञान ग्रहण नाही केले तर तुमची देखील गणना मुक्या प्राण्यांप्रमाणे होईल असा गंभीर इशारा देऊन आपल्या काव्य पंक्तीमधून त्यांनी खऱ्या अर्थाने ‘काव्यजागर‘ घालून लोकनितीसमाजनितीराजनितीला सावित्रीमाईंनी काव्यातून घेराव घालून आपला लोकजागृतीचा अधिक जोमाने पुढे रेटलासावित्रीमाईच्या कविता खऱ्या अर्थाने वाङ्‌मयीन परिघात दुर्लक्षितच राहिल्यात्यांच्या कवितांचा काव्यजागर देखील कारवा शाळामहाविद्यालयेविद्यापीठ इतर शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजासमोर ठेवल्या पाहिजेतत्यांच्या कवितेवर चर्चासत्रेपरिसंवादव्याख्याने आयोजित करुन सावित्रीमाईचा काव्यजागर जगासमोर नव्याने मांडणी केली तरच खर्या अर्थाने सावित्रीमाईना जयंतीदिनी काव्यांजली अर्पण केल्यासारखे होईल.

– मारोती भुकदम,

प्रयोगशील मुख्याध्यापक जि..प्राशाळा महातपूरी तापूर्णा जिपरभणी 

मो.नं. 9049025351

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button