सामाजिक

आधी पुनर्वसन मगच लेंडी धरण करा ; अन्यथा धरणग्रस्त घेणार जलसमाधी – राजीव पाटील.

मुखेड / प्रतिनिधी.

सन २००६ च्या कायद्यानुसार आधी लेंडी प्रकल्पातील धरणग्रस्तांचे पुनर्वसन करुन मगच धरण करा अन्यथा धरणग्रस्त जलसमाधी घेणार असल्याची माहिती लेंडी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव पाटील रावणगांवकर यांनी दिली आहे.
 जिल्हाधिकारी नांदेड यांनी लेंडीधरण परिसरातील गावात कलम १६३ लागू करुन धरणग्रस्तावर एक प्रकारे अन्याय केला आहे.जे अनाधिकृत गाळ भरणीचे काम चालू आहे ते बंद करावे अशी मागणी आम्ही १२ गावातील धरणग्रस्त, सामाजिक संघटना,सामाजि कार्यकर्ते करीत आहोत असेही राजु पाटील यांनी म्हटले आहे.आधी धरणग्रस्तांचे  पुनर्वसन न करता लेंडीचे कार्यकारी अभियंत्यांनी धरणग्रस्तांध्ये आपआपसात फुट पाडुन दिशाभूल करीत आहेत. जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत धरणग्रस्तांना आश्वासन दिले होते की, प्रत्येक गावात भेट देऊन पुनर्वसानाचा आढावा घेतल्यानंतर गाळभरणीचे काम सुरु करु असे ठरले होते.पण प्रशासनाने लेंडीच्या धरणग्रस्तांना विश्वासात न घेता लेंडीचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाधिकारी यांना चुकीची माहिती देऊन पुनर्वसनाचे व भुखंडाचे वाटप काम पुर्ण झाले असे कागदोपत्री दाखविले अन धरणग्रस्त पुनर्वसन ठिकाणी स्थलांतर झाल्याचे जिल्हाधिका-यांना सांगितल्याने जिल्हाधिकारी यांनी गाळभरणीच्या कामाचा निर्णय घेतला पण हा निर्णय धरणग्रस्तांना जिवंतपणी मरणयातना देणे होय असेही पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी यांनी सन २००६ च्या कायद्यानुसार आधी पुनर्वसन मगच धरण करावे अन्यथा धरणग्रस्त जलसमाधी घेणार यासाठी काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार असल्याचेही लेंडी संषर्घ समितीचे अध्यक्ष राजीव पाटील यांच्यासह उमाकांत वाकडे,माधवअप्पा पंचडे,सुधाकर पाटील इंगोले, शिवशंकर पाटील,संदिप पाटील, तानाजी आगदे,देशमुख भेंडेगावकर,निळकंठ पाटील कोळनुरकर,बालाजी पाटील, आनंदा पाटील,राम पाटील, एकनाथ पाटील, मशरूदिन पटेल,जैनोद्दीन पटेल,शादुल पटेल यांनी इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button