Uncategorized

ग्रामदैवत वीरभद्र स्वामी यात्रेला उत्साहात सुरुवात; २ डिसेंबर रोजी शिरणी तर ३ डिसेंबर रोजी पहाटे अग्नीकुंड

मुखेड : प्रतिनिधी

मुखेडचे ग्रामदैवत श्री वीरभद्र स्वामी यात्रेला दि. २७ नोव्हेंबरपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. पाच दिवस चालणारी ही यात्रा प्रतिवर्षी कार्तिक पोर्णिमेपासून प्रारंभ होत असते यात्रेसाठी महाराष्ट्रासह तेलंगाना, आन्ध्रप्रदेश, कर्नाटक सह राज्यातुन भाविक शहरात दाखल होत आहेत. २ डिसेंबर रोजी शिरणी तर ३ डिसेंबर रोजी पहाटे अग्नीकुंड, दुपारी १२ वाजता जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम होणार आहे.

मुखेडचे ग्रामदैवत श्री. विरभद्र स्वामी यात्रेस दि.२ डिसेंबर रोज शनिवार सायंकाळी मंदिरात शिरणी, प्रसाद- गुळवाटण्याचा कार्यक्रम आहे तर दि. ३ डिसेंबर रोज रवि- वार रोजी पहाटे ४ वाजता अग्निकुंड त्यानंतर पालखी मिरवणूक शहरांमध्ये मुख्य मागार्ने काढण्यात येणार आहे. यात्रेनिमित्त मंदिर रोषणाईने सजले आहे. मुखेडचे ग्रामदैवत श्री विरभद्र स्वामी हे हजारो भक्तांचे कुलदैवत व वीरशैवांचे तीर्थक्षेत्र असुन श्री वीरभद्र स्वामी यात्रेस मोठया उत्साहात प्रारंभ होत

कार्तिक पोर्णिमेपासून प्रारंभ होत असलेल्या पाच दिवसाच्या उत्सवाचे खास वैशिष्टये म्हणजे पाचव्या दिवशी होणारे धगधगते ह्रअग्निकुंडल होय. यात अनेक भाविक भक्त पहाटे स्नान करुन त्या धगधगत्या निखा-यावर पालखीसह चालत जातात. दि.२ डिसेंबर रोजी वीरभद्र स्वामी सेवा भक्त मंडळाच्या वतीने महाप्रसाद आयोजित करण्यात येणार आहे. तर स्थानिक गायकांच्या वतीने संगीताचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे दि.३ डिसेंबर रोजी हुतात्मा माधव एकलारे विद्यालयाचे मैदान येथे दुपारी १२ वाजता जंगी कुस्त्यांचा सामना होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button