सामाजिक

मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा; आपत्ती टाळण्यासाठी सज्ज राहा —जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज़ ४ मे २६

 जिल्ह्यात संभाव्य पावसाळी आपत्ती टाळण्यासाठी सर्व विभागांनी #मान्सूनपूर्व कामेवेळेत पूर्ण करावीत आणि आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तात्काळ सादर करावेतअसे निर्देशजिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉशंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आयोजित मान्सूनपूर्व आढावाबैठकीत ते बोलत होतेयावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमारमनपा आयुक्त डॉमहेशकुमारडोईफोडेअपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाडअपर पोलिस अधिक्षक सूरज गुरवनिवासीउपजिल्हाधिकारी किरण अंबेकरजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हेउपविभागीयअधिकारीतहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले कीयावर्षी पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी उष्णतेमुळे अचानकमुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाहीत्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनानेसज्ज राहणे गरजेचे आहे.

विष्णुपूरी धरणात सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा असून त्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचनात्यांनी दिल्यातसेच धरणाचे गेटनवीन पाईपलाईन कामे यांची स्थिती तपासण्याचे निर्देश देण्यात आलेमागील वर्षी मुखेडनायगावबिलोलीकंधार यासह विविध तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊनअनेक गावांचा संपर्क तुटला होतायंदा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी ठोसउपाययोजना कराव्यातअसेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील नाल्यांची स्वच्छता करून सखल भागात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावीतसेच पूलआणि रस्त्यांवरून पाणी वाहून जाऊन नागरिक अडकणार नाहीत यासाठी नियोजन करण्याच्या सूचनादेण्यात आल्या.

आरोग्य विभागाला ग्रामीण भागात औषधसाठा मुबलक ठेवण्याचेतसेच सर्पदंशावरील औषधे सर्वआरोग्य केंद्रात उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेपशुसंवर्धन विभागाने नदीपात्रात पशुधन बांधू नयेयासाठी जनजागृती करावीअसेही सांगण्यात आले.

बैठकीच्या शेवटीसर्व विभागांनी तालुका पातळीवरील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून आपत्तीव्यवस्थापनाचे आराखडे तात्काळ जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेतअसे निर्देश जिल्हाधिकारी कर्डिलेयांनी दिले.

जिल्हाधिकारी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी यांच्या अडचणी  समस्या जाणून घेतल्या.यावरउपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन केले  सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे पूर्ण करण्याचे निर्देशत्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button