धर्मांची भिंत नाही, माणुसकीचा पूल: पुण्यात पावसात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर अविष्कार

“धर्म माणसांना वेगळं करत नाही, मनं जोडली गेली पाहिजेत.”
पुणे : पावसाच्या तडाख्यामुळे एक लग्न धोक्यात आलं होतं, पण माणुसकीच्या ओलाव्याने तो सोहळा अविस्मरणीय झाला. पुण्यातील वानवडी परिसरात मंगळवारी संध्याकाळी हिंदू विवाह सोहळ्याला अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे गोंधळ उडाला. खुल्या लॉनमध्ये आयोजित करण्यात आलेला विवाह अक्षरश: अडचणीत आला होता. मात्र, याच क्षणी धर्मापेक्षा मोठ्या असलेल्या एका भावनेने – सहजीवनाच्या – एका सुंदर उदाहरणाची साक्ष पुणेकरांनी घेतली.
पावसामुळे विवाहस्थळी पाणी साचले, पाहुणे पळापळ करू लागले आणि मुहूर्त जवळ येत होता. अशावेळेस शेजारच्या हॉलमध्ये सुरू असलेल्या मुस्लिम रिसेप्शनने माणुसकीचा हात पुढे केला. कोणतेहीधार्मिक वा सामाजिक भेद न करता त्यांनी हिंदू विवाहासाठी आपला मंच खुले दिले.
कवडे आणि गलांडे पाटील कुटुंबीय जेव्हा त्या मुस्लिम कुटुंबियांच्या नातेवाईकांकडे मदतीसाठी गेले, तेव्हा त्यांना कुठलाही विचार न करता ‘हो‘ उत्तर मिळालं. दीड तासासाठी पूर्ण रिसेप्शन हॉल हिंदूविवाहासाठी खुला करण्यात आला. तिथे चि. सौ. कां. संस्कृती आणि चि. नरेंद्र यांचा विवाह विधिपूर्वकपार पडला.
मंगलाष्टकाच्या गजरात, साक्षीदार निसर्ग आणि उपस्थित सर्व धर्मीय पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहएक नवा संदेश देऊन गेला – “धर्म माणसांना वेगळं करत नाही, मनं जोडली गेली पाहिजेत.”
या प्रसंगाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे, दोन्ही विवाहसमारंभांचे नवविवाहित जोडपे आणि नातेवाईकांनीएकत्र फोटो काढले, गोडधोड भोजनात सहभागी झाले, आणि एका क्षणापुरतं का होईना – पण “भारतहा एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे” याचं जिवंत उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं.
पाऊस हा अडथळा न ठरता, तो एका नव्या सुरुवातीचा पूल ठरला. आणि माणुसकीच्या या प्रसंगाने पुन्हाएकदा दाखवून दिलं –
“धर्म वेगळे असले तरी, आपुलकी आणि मदतीची भावना सगळ्यांना एकत्र आणू शकते.”



