महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 ला निकाल

मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं असून, केंद्रीयनिवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर कार्यक्रम आज (दि.15) जाहीर केलाआहे. जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. तर, मतमोजणी होऊन निकाल 23 नोव्हेंबरला घोषित केले जाणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसहे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर ही पहिली विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे राज्याच्याराजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानेआजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रासह निवडणूक आयोगाने झारखंडमध्येहोणाऱ्या विधानसभांच्या तारखांचीही घोषणा केली आहे. या ठिकाणी दोन टप्प्यात निवडणुका पार पडणारपहिला टप्पा 13 नोव्हेंबरला तर, दुसरा टप्पा 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून, निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.
महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या 9.63 कोटी आहे. त्यापैकी 4.97 कोटी पुरुष आिण 4.66 कोटीमिहला मतदार आहेत. पिहल्यांदा मतदान करणाऱ्यांांची संख्या 20.93 लाख आहे. यातील 234 जागाया सर्वधाराण उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी 25 तर 29 जागा या अनुसूिचत जाती प्रवर्गासाठीराखीव आहेत. 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून िदलीजाईल. व्होटर हेल्पलाईन ॲपमध्ये त्यांचे मतदान नेमके कुठे आहे, ते पाहू शकतील असेही राजीव कुमारयांनी सांिगतले. यािशवाय मतदान प्रिक्रयेचे िचत्रीकरण होणार असून, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्याउमेदवारांना वृत्तपत्रात मािहती द्यावी लागणार आहे. महाराष्ट्रात एक लाख 186 पोिलंग बुथ असतील विधानसभेला िनवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्याअर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणारआहेत, अशी मािहती िनवडणूक आयुक्तांनी दिली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत िनवडणुकीचा कार्यक्रमपूर्ण होणार आहे.



