सैनिक फेडरेशनच्या वतीने पाळ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
विविध पदावर रूजू झालेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचाही गौरव.
मुखेड/ प्रतिनिधी.
तालुक्यातील पाळा येथील दहावी तसेच बारावी बोर्ड परीक्षेसह विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सैनिक फेडरेशनच्या पाळा येथे मारुती मंदिर परिसरात मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी प्रशस्तिपत्र शाल पुष्पहार देऊन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे विद्यार्थी सह त्यांच्या पालकांच ही विशेष सत्कार करण्यात आला आहे या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला आहे.विद्यार्थ्याचे सन्मान सोहळ्याचे आयोजन राजे छत्रपती अकॅडमीचे संचालक तथा सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांनी केले होते.
प्रतीवर्षी पाळा येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करन्यात येत आहे.सन्मान सोहळयाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच सुरेश पाटील पाळेकर होते तर उद्घाटक म्हणून संभाजी पाटील उमाटे यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी प्रबोधन महाराज पाळेकर,संभाजी ब्रिगेडचे कंधार तालुकाध्यक्ष नितीन पाटील कोकाटे हे होते.यावेळी उपसरपंच सुभाष पाटील डुमणे, बालाजी पाटील वडजे,ॲड. गोविंद डुमणे, उद्धव पाटील उमाटे, नागनाथ कोंडेवाड,पप्पू पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील तोटरे, उमाकांत उमाटे, रमेश मुंजेवार, माधव पाटील डुमणे,शंकर पाटील डुमणे, शादुलसाब शेख, बाबू पटेल, बालाजी पाटील उमाटे,बालाजी आईनवाड,धोंडीबा पाटील उमाटे सह गावातील ज्येष्ठ मंडळी, प्रतिष्ठित नागरिक, युवक व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी संजय डुमणे, सहशिक्षक बाबुराव डुमणे, शिवाजी मेतलवार, बालाजी दासरवाड यांना पदोन्नती व उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच रवींद्र ढगे, माधव तोटरे यांच्या सेवानिवृत्ती बद्द्ल सत्कार करण्यात आला तसेच सैनिक बालाजी बोंतेवाड,पांडुरंग दिंडे, दीपक डुमणे,साजिद शेख या सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला.गावातील प्रशासन सेवेत नव्याने रुजू झालेले पशुवैद्यकीय अधिकारी कु.शितल मुंजेवार,पोलीस पाटील पदावर गिरीराज उमाटे, सहाय्यक ऑपरेटर दीपक तोटरे, सैनिक अविनाश कांबळे, शिक्षक गणेश मुंजेवार,बालाजी मेतलवार तसेच दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील मुला/ मुली मधून प्रथम द्वितीय तृतीय आलेले तसेच शिष्यवृत्ती पात्र,जिल्हा व विभागीय पातळीवर खेळांमध्ये अव्वल स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांनी केले तर सूत्रसंचलन बजरंग पाटील पाळेकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधव पाटील डुमणे,रवींद्र ढगे, शिवाजी मेतलवार यांचे विशेष सहकार्य तर राजे छत्रपती अॅकडमीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
आपल्या अथक परिश्रमातून विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंतांच्या पाठीवर ठेवलेली थाप भविष्यात त्यांना अजून मोठं होण्यासाठी नक्कीच कामी येईल आणि यातूनच नवीन पिढीला प्रेरणा मिळत राहील. जेव्हापासून मुखेड तालुक्यांमध्ये राजे छत्रपती अकॅडमीची सुरुवात झाली तेव्हापासून तालुका व गाव पातळीवर सैन्य व पोलीस भरतीची संख्या वाढत आहे या गोष्टीचा मला आनंद आहे.अशी भावना राजे छत्रपती अकॅडमीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांनी व्यक्त केली.