आ.डॉ तुषार राठोड यांना आरोग्यमंत्री पदी निवड करुन, रुग्णसेवा मजबूती करण्याची संधी द्यावी- आदी बनसोडे
मुखेड प्रतिनिधी:-
मुखेड:- मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपा पक्षाकडून प्रचंड मताधिक्यानेविजयी होणारे आमदार डॉ तुषार राठोड यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळा मध्ये आरोग्यमंत्री पदी निवड करुन, महाराष्ट्रातील आरोग्यसेवा मजबुती करण्यासाठी संधी द्यावी, अशी मागणी नर्सेस संघटना समन्वय आदीबनसोडे यांनी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र भाजपाचे सर्वेसर्वा मा. देवेंद्र फडणवीसयांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे.
मुखेड कंधार मतदार संघामध्ये मागील दहा वर्षांच्या कालावधीत प्रचंड प्रमाणात निधी मंजूर करुनतालुक्याचा सर्वांगिण विकास केला आहे, डॉ तुषार राठोड हे स्वतः एम बि बि एस , रेडीओलाॅस्टिटवैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा देऊन वडीलांच्या निधनामुळे, रिक्त झालेल्या विधानसभापोटनिवडणुकीत मतदारसंघातील नागरीकांच्या आग्रहास्तव राजकारण आले त्यांनी मतदार संघातसर्वाणगिक विकासाबरोबरच शहरातील नागरिकांनसह ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवाउपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची मंजुरी आणून, तालुक्यातील आरोग्यसेवामजबुत केली आहे, शहरांमध्ये 100 खांटाचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करुन आणले, कोरोना काळातदेवदुता सारखं नागरिकांच्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे आरोग्याची काळजी घेतली, नागरिकांना मास्क वाटप, आरोग्य तपासणी, सोशल डिसटंन्स पाळून भाजीपाला, किराणा उपलब्ध करुन दिले, अनेकांना राशन किटवाटप केले, नागरिकांच्या सेवेसाठी स्वतः कोव्हिड पाॅझिटीव्ह झाले, असे होऊनही कोव्हिड रुग्णांनावेळोवेळी धिर दिला, अंगणवाडी,शाळा बंद असताना शासनाकडून मागणी करुन, पाकीट बंद खाऊचेघरपोच वाटप करुन, बालकांच्या पोषणाची जबाबदारी देऊन कुपोषणापासुन रोखणाऱ्या युवा नेतृत्वलोकप्रिय आमदार डॉ तुषार राठोड यांची महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या विस्तारात आरोग्यमंत्री पद देऊनमहाराष्ट्राची आरोग्यसेवा मजबुत करण्याची संधी द्यावी, अशी मागणी मतदार संघातील युवक आरोग्यदूतनर्सेस संघटना मराठवाडा विभागाचे समन्वयक आदी बनसोडे यांनी निवेदनाद्वारे भाजपाचे प्रदेश अध्यक्षचंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र भाजपाचे सर्वेसर्वा मा. देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे