मुखेड व परिसरातील भाविकांनी मनोभावे पूजा करून शनिदेवाचे घेतले दर्शन
मुखेड प्रतिनिधी
मुखेड :- शनिवार दि.३० नोव्हेंबर रोजी मुखेड शहर, कर्नाटक, तेलंगणा सह विविध ठिकाणच्या भाविकांनीशनी मंदिरात जाऊन शनिदेवाचे मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. मुखेड व परिसरातील भाविकांचेदर्शनासाठी लांब रांगा लागल्याने रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शन घेतले. शनी पिडा परिहार्थ तेल, काळेतीळ खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. मुखेड तालुक्यात गत काही दिवसांपासून नैसर्गिक संकटाचीमालिका सुरू आहे. कधी अतिवृष्टी तर पावसाने दिलेली ओढ यातून पिकेही हातची गेल्याने शेतकरी हतबलदिसून येत आहे. तालुक्यात हिवताप, डेंग्यू, टायफॉइड, चिक न गुनियासारख्या आजाराने अनेक जण त्रस्तआहेत. जीवनात संकटाची मालिका खंडित व्हावी, जगणे सुसह्य व्हावे, रब्बी हंगामात शिवार सुजलामसुफलाम व्हावे, आर्थिक सुब्बता यावी, संकटे, साडेसात्ती हद्दपार व्हावी यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनीशनिवारी सकाळ पासूनच दर्शनासाठी रांगा, लावल्या होत्या. मुखेड शहरात प्राचीन अतिशय स्वयंभूशनिदेवाचे जाज्वल्य पुरातन मंदिर उंच निसर्ग रम्य डोंगरावर काळी पाषाणाची ४ ते ५ देखणी मूर्ती मंदिरातशनीच्या साडेसाती व पीडा परिहार्थ शनी देवाची वक्रदृष्टी होवु नये म्हणून अनेक भाविकांनी पूजा अर्चाकेली. शनिवारी सकाळी १० वाजुन १९ मिनिटाला सुर झालेली अमावस्या रविवारी सकाळी ११ पर्यंत होती. त्यानिमित्त विविध प्रकारच्या साहित्याची विक्री झाली आहे. काळे तीळ तेल, काळे उडीद, पांढरे फूल, नारळ, धूप घेऊन भाविकांनी शनिवारी सकाळपासून मंदिर परिसरात दर्शनासाठी लांब अंतर राखत रांगा लावल्या. नवसाला हमखास पावणारे शनिदेव म्हणून मंदिर प्रसिद्ध आहे. नवस फेडण्यासाठी पूर्तता करण्यासाठीअनेक भाविक दुरून येत असतात. श्री शन्नेश्वराय नःम चा जयघोष करीत हजारो भाविक– भक्तांनी दर्शनघेतले आहे.