मुखेडमध्ये शौर्य दिनानिमित्त मोटारसायकल रॅली काढून अभिवादन
मुखेड प्रतिनिधी:-
मुखेड : दि १ जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त मुखेड शहरात मोटारसायकल रॅली काढून रॅलीत भीमाकोरेगाव येथील शूरवीरांना मानवंदना देण्यात आली. या रॅलीचे आयोजन विजय लोहबंदे व आशिष भारदेयांनी केले. ही मोटारसायकल रॅली शहरातील मुख्य रस्त्यांवरून काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकरस्मारकाजवळ विसर्जित करण्यात आले.
या दिवशी १८१८ च्या भीमा कोरेगाव युद्धातील शूरवीरांच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. रॅलीच्या समारोपवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील स्तंभांना वंदन करण्यात आले. या रॅली दरम्यान काही अनुचितघटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रेयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. यावेळी विजय लोहबंदे,आशिष भारदे, प्रवीण मोरे, क्षितिज हसनाळकर, विश्वा गायकवाड, नितीन सोनकांबळे, आसद बल्खी, जयभीम सोनकांबळे, प्रशांत भालेराव, किशोर लोहबंदे, सिद्धार्थ कांबळे, मोहन गायकवाड, आशुतोषकांबळे, रियाज शेख,एस के बबलु,कुलदीप कोतापल्ले यासह या रॅलीमध्ये स्थानिक नागरिक, तरुण वर्ग आणि सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्तसहभाग होता. शौर्य दिनानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या उपक्रमामुळे ऐतिहासिकवारसा आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात यश आले.