शहर
साबीर अलीशाह खादरी उर्सनिमित्त संदलसह विविध कार्यक्रम उत्साहात.
मौलाना नक्षबंदी यांचे व्याख्यान व लतीफ हैरा यांच्या कव्वालीचा रंगला समा.
मुखेड / प्रतिनिधी.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हजरत सय्यद साबीर अलीशहा खादरी यांच्या उर्सनिमित्त संदल, व्याख्यान व कव्वालीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २९ व ३० डिसेंबर रोजी मुखेड येथील दर्गाहमध्ये करण्यात आले होते.हैद्राबाद येथील प्रसिद्ध व्याख्याते मौलाना अहेमद नक्षबंदी यांच्या व्याख्यानाचा व प्रसिद्ध कव्वाल लतीफ गैरसोय यांच्या जब्बरदस्त कव्वालीचा तेलंगाना,आंध्रप्रदेश,कर्नाटका व महाराष्ट्र राज्यातील भाविक भक्तांनी तसेच मुखेड शहर व तालुक्यातील नागरिकांनी लाभ घेतला आहे.कव्वाल हैरा यांनी एकाहून चढ एक कलाम,नाथ, कव्वालीचे सादरीकरण करत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
तेलंगाना,आंध्रप्रदेश,कर्नाटका व महाराष्ट्र राज्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले मुखेड येथील हाजरत साबिर अल्लीशहा दर्गाह येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात उर्सनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन उर्स कमिटीच्या वतीने करण्यात येते.याहीवर्षी उर्सनिमित्त दि.२९ डिसेंबर रोजी शहरातील अकबर खान खंडोबा गल्ली मुखेड यांच्या घरुन ढोलताशाच्या गजरात वाजत-गाजत संदल ची मिरवणुक निघुन बाजार लाईन मेनरोड,बसस्थानक समोरून, लोखंडे चौक ते खैरका रोड दर्गा येथे जावुन तेथे प्रार्थना करुन मिरवणुकीचा समारोप करण्यात आला याचदिवशी रात्री १० वाजता हैद्राबाद येथील प्रसिद्ध व्याख्याते मौलाना मोहमद अहेमद नक्षबंदी यांचे धार्मिक व समाज प्रबोधनपर विषयावर व्याख्यान संपन्न झाले.तसेच दुस-या दिवशी ३० डिसेंबर रोजी प्रतिवर्षाप्रमाणे प्रसिद्ध कव्वाल लतीफ हैरा यांच्या कव्वालीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.यादरम्यान कव्वाल हैरा यांनी आपल्या संच्चासह एकाहून चढ एक कव्वाली, कलाम,नाथचे सादरीकरण करीत उपस्थित सर्व भाविकांना मंत्रमुग्ध केले.
मुखेड येथे दरवर्षी हजरत सुफीसंत सय्यद साबीर अलीशहा खादरी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन उर्स,संदल,कव्वालीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.प्रतिवर्षाप्रमाषमणे २९ रोजी उर्सनिमित्त संदल तसेच ३० डिसेंबर रोजी लतीफ हैरा कव्वाल जळगावकर यांचा कव्वालीचा जंगी कार्यकम संपन्न झाला आहे.सय्यद साबिर अल्लीशहा दर्गा येथे आयोजीत सदरील विविध कार्यक्रमासाठी मौलाना,वेगवेगळ्या दर्गाहचे हाजरत,विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते,सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व पत्रकार सह अनेक मान्यवरांची उपस्तिथी लाभली आहे.सदर कार्यक्रमांचा मोठ्या संख्येने नागरिक,भाविक भक्तांनी उपस्थित राहुन लाभ घेतला.उर्स कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व भाविकांना दोन दिवस शुद्ध पाणी व स्वरुची भोजनाची व्यवस्था दर्गाह कमिटीच्या वतीने करण्यात आली होती.दोनदिवसीय विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दर्गाचे सज्जादा हाफीज जमालोदीन खादरी,उर्स कमीटीचे अध्यक्ष हाजी काझी सय्यद साबीर,उपाध्यक्ष सय्यद सुभानीसाब,कोषाध्यक्ष पठाण अनवर खॉन,शेख अमीर,हाजी अहेमद कंधारी,शेख बाबा मियाँ लाटवाले,सय्यद शमशोदीनसाब, पठाण रुस्तुमखॉ, शेख मौला वोडाफोन,अहेमद खाँन, शेख मुन्ना पेंटर,शेख अहेमदभाई बेळीकर,शेख हसन बेळीकर, ताजोद्दीन बेळीकर,शेख इब्राहीम बल्खी,शेख आमेर सह अनेकांनी परिश्रम घेतले आहे.सदरील कार्यक्रमांचे सुत्रसंचलन हाजी साबेर सय्यद यांनी केले तर उपस्थितांचे आभार अनवरखाँ पठाण यांनी मानले.कार्यक्रमास तेलंगाना,आंध्रप्रदेश,कर्नाटक, महाराष्ट्र राज्यासह नांदेड जिल्हा व मुखेड तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उर्सदरम्यान भाविकांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.संतोष टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ.जुनेद व त्यांची टीम उपस्थित होती.त्याचबरोबर कार्यक्रमावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक मंचक फड यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.दर्गाह उर्स कमिटीच्या वतीने सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.