Uncategorized

नांदेडमध्ये रविवारी मोठी दुर्घटना! नगीना घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुरड्यांचा गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू!!

नांदेड प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ २४ मे २६

नांदेड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहेसाठे चौकपरिसरातील तीन मुले आज रविवार (२४ मेसंध्याकाळच्या सुमारास गोदावरी नदीच्या नगीना घाट येथे पोहण्यासाठी गेली होतीमात्रनदीच्या पात्रातील पाण्याचा अंदाज  आल्यामुळे तिघेही जण पाण्यातबुडू लागलेया दुर्दैवी अपघातात दोन निष्पाप चिमुरड्यांचा बुडून जागीच मृत्यू झाला आहेया घटनेमुळेसाठे चौक आणि संपूर्ण नांदेड परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

मयत मुलांची नावे १रणवीर यशवंत शिंगाडे (वय १४ वर्षेरासाठे चौकनांदेड) गणेश डोंगरे (वय १३ वर्षेरासाठे चौकनांदेड) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसारउन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि वाढत्या उकाड्यामुळे साठे चौक परिसरातील तीन लहान मुले आज संध्याकाळी नगीना घाटयेथे पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेली होतीनदीच्या पात्रात उतरल्यानंतर पाण्याचा खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज  आल्याने ही मुले अचानक पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली आणि बुडू लागलीमुलांना बुडताना पाहून परिसरात एकच खळबळ उडालीस्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने धावघेतलीपरंतु तोपर्यंत उशीर झाला होताया दुर्घटनेत रणवीर शिंगाडे आणि गणेश डोंगरे या दोन बालकांचा करुण अंत झाला.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतलीमृतदेहनदी बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेतयाप्रकरणी सध्या नांदेड येथील वजीराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दोन खेळत्याबागत्या चिमुरड्यांचा असा अचानक नदीत बुडून मृत्यू झाल्याने मृतकांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.

उन्हाळ्याच्या दिवसांत मुले नदीतलाव किंवा विहिरीवर पोहण्यासाठी जातातमात्र पाण्याचा अंदाजनसणे अनेकांच्या जीवावर बेतत आहेपालकांनी आपल्या लहान मुलांकडे विशेष लक्ष ठेवावे आणित्यांना एकट्याला किंवा सुरक्षिततेच्या साधनांशिवाय पाण्यात जाण्यापासून रोखावेजेणेकरून अशादुर्दैवी घटना टाळता येतील.

सदरील फोटो ही AI द्वारे बनवलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button