पाण्याविना जीवन अशक्य आहे. पण इथे जीवनच पाण्याच्या शोधात भटकतंय

•हंडाभर पाण्यासाठी लोकांची वणवण मग लाखो रुपये गेले कुठं?
•जल व्यवस्थापन पंधरवडा प्रत्यक्षात नाही,फक्त कागदावर
•जनजीवन चा कोट्यावधी निधी गेला कुठे ?
मुखेड -(ता. प्रतिनिधी) दि २४ एप्रिल २५
एका बाजूला उन्हाचे चटके वाढू लागले आहेत तर दुसरीकडे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालीय. सरकारी योजना फक्त कागदावर असल्याने अनेकांच्या वाट्याला भटकंती आलीय. त्यामुळे सरकार पाण्याच्या टंचाईवर कधी तोडगा काढणार? हा खरा प्रश्न आहे.
पाटबंधारे मंडळाच्या अखत्यारित येणारे उर्ध पाटबंधारे विभाग आणि लेंडी प्रकल्प यांच्यावरील देखभालव दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
तालुक्यातील खेड्यापाड्यात पाण्याची वाणवा जल व्यवस्थापन पंधरवडा उरला फक्त नावालाच हंडाभर पाण्यासाठी लोकांची भटकंती सध्या मुखेड येथे मुखेड पाटबंधारे मंडळाच्या वतीने “जल व्यवस्थापन पंधरवडा” साजरा केला जात आहे.

मात्र प्रत्यक्षात तालुक्यांतील ग्रामीण भागात नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी देखील वणवण फिरावी लागत आहे. दुसरीकडे, तलावातील अवैध गाळ उपसा मात्र जोमात सुरू असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे तालुक्यातील गावागावात व तांडा हा उपक्रम पोहोचवण्याचा विसर पाटबंधारे विभागाला पडल्याचे स्पष्ट होत आहे.

पाटबंधारे मंडळाच्या अखत्यारित येणारे उर्ध पाटबंधारे विभाग आणि लेंडी प्रकल्प यांच्यावरील देखभाल वदुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
लघु सिंचन प्रकल्प पाटबंधारे मंडळाने कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव, सिमेंट बंधाऱ्यांचे सर्वेक्षण करूनत्याचा आराखडा तयार करण्याची व दुरुस्ती–नवनिर्मिती करण्याची जबाबदारी घेतली आहे.पण प्रत्यक्षात अनेक बंधारे कोसळले आहेत,अनेक ठिकाणी पाणी साचत नाही, तर काही बंधारे फक्त कागदोपत्री अस्तित्वात आहेत.
ऐकूनच येईल घेरी गेल्या पाच वर्षांत पाटबंधारे विभागात कोणत्याही नव्या सिंचन प्रकल्पाला तांत्रिकमान्यता दिली गेली नाही. मुखेड, येवती, बा–हाळी, जांब ,बेटमोगर, एकलारा, जाहुर, राज दापक आणि मुक्रमाबाद सारख्या आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये चांगले पर्जन्यमान असूनही जंगलातून वाहणाऱ्या नैसर्गिक जलस्त्रोतांवर कोणतेही नवीन प्रकल्प सुरू करण्यात आलेले नाहीत.यामुळे पाण्याचे दुर्भिक्षनिर्माण होऊन लोकांना भटकावे लागत आहे.
जलसंधारण व भूजल पुनर्भरणासाठी तालुक्यातील कोणत्या गावात, कोणत्या वर्षी,कोणत्या तारखेला जलसंधारण किंवा भूजल पुनर्भरणाचे उपक्रम राबवले गेले,याची माहिती फोटो सहित मुखेड पाटबंधारे मंडळाकडे उपलब्ध नाही.
शेतकऱ्यांना पाणी वापरा संदर्भात मार्गदर्शन,पाणी वापराचे नियोजन, आणि पाणी वापर संस्था स्थापन करण्याबाबत देखील विभागाकडे पाच वर्षांतील कोणतीही आकडेवारी नाही.
या वसुंधरा दिनी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यासाठी पूरक ठरणाऱ्या 5 उत्कृष्ट इलेक्ट्रिकस्कूटर नवीन सिंचन प्रकल्पांसाठी किती प्रस्ताव तयार करण्यात आले. किती निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्या,व किती वर्क ऑर्डर्स जारी करण्यात आल्या याचा लेखाजोखा देखील उपलब्ध नाही.
त्यामुळे सरकारने लक्ष देऊन इथल्या लोकांची पाण्यासाठीची भटकंती थांबवावी, ही गावकऱ्यांची मागणी आहे.



