विधानसभेला ‘लाडकी बहीण योजने’चा महायुतीला फायदा होणार का? सर्व्हेतून धक्कादायक माहितीसमोर

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर राज्यातसत्ताधारी महायुतीने अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजनेचा देखीलसमावेश आहे.
या योजनेद्वारे राज्यातील महिलांना दरमहिना १५०० रूपयांची आर्थिक मदत सरकार देत आहेत. राज्यातविधानसभा निवडणुका ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. याच अनुषंगानेसत्ताधारी पक्षाने ही योजना सुरू केलीय, असा आरोप विरोधक करत आहेत. आता खरंच महायुतीलाविधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण योजने‘चा फायदा होणार का? हे जाणून घेवू या.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक लोकोपयोगी योजना सुरूकेल्यात. यामध्ये ‘लाडकी बहीण योजना‘ ही प्रमुख आहे. सरकारने ८० लाख महिलांच्या खात्यावर तीनहजार रुपये जमा केले आहेत. महिला सक्षमीकरणावर भर देणारं हे पाऊल गेम चेंजर असल्याचं महायुतीनेम्हटलंय. याबाबत राज्याचे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि सेफॉलॉजिस्ट दयानंद नेने यांनी १६ ऑगस्ट ते२५ ऑगस्ट दरम्यान राज्यात सर्वेक्षण केलंय. यामध्ये त्यांनी ‘लाडकी बहीण योजने‘चा महायुतीला फायदाहोणार का? असा एक प्रश्न देखील विचारलेला होता.
सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर
सर्वेक्षण केलेल्या एकूण लोकांपैकी ४० टक्के लोकांनी महायुतीला फायदा होईल, असं सकारात्मकप्रतिसाद दिलाय. मात्र ३७ टक्के लोकांनी नकारार्थी उत्तर दिलंय. तर २३ टक्के लोकांनी माहिती नसल्याचंनमूद केलंय. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी मोठे कार्यक्रमदेखील आयोजित केले होते. महाआघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने लाडकी बहीण योजनेवरनिवडणूकपूर्वी प्रचार केंद्रित केलाय. या योजनेमुळे महायुतीच्या बाजूने कोणतीही लाट निर्माण झालेलीनाही, असं मत दयानंद नेने यांनी सर्वेक्षणाच्या निकालानंतर व्यक्त केलंय.
ही योजना निवडणूक स्टंट असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केलीय. सरकार फुकटात पैसे वाटप करतअसेल तर का सोडायचं? असं देखील अनेकजण म्हणत आहेत. या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्या अशीव्यक्तिगत प्रतिक्रिया नेने यांनी दिलीय. कारण आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या कुटुंबातील अनेक महिलांनाया योजनेचा लाभ मिळालेला आहे, याबाबत राज्य सरकारने चौकशी करावी, असं देखील नेने म्हणालेआहेत.
लाडकी बहीण योजने’चा महायुतीला फायदा होणार?
यंदा राज्यात अर्थसंकल्पात महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत २१ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याची घोषणा केली होती. या योजनेसाठी अर्जदारमहिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं. महिलेच्या कुटुंबातील कोणतीहीसदस्य आयकर भरत असेल, तर ती महिला या योजनेसाठी पात्र नाही. राज्यातील सुमारे दीड कोटी महिलाया योजनेसाठी पात्र ठरण्याची अपेक्षा आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या योजनेला थेट विरोध केला नसून प्रश्न उपस्थित केलेत. ही योजनानिवडणूक स्टंट असल्याची टीका विरोधकांकडून केली जातेय. हरियाणा आणि जम्मू–काश्मीरमधीलनिवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होण्याचीशक्यता आहे. येत्या ९ ऑक्टोबरला निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल, असाअंदाज आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेचा किरकोळ लाभ महायुती सरकारला मिळतानादिसत असल्याचं सर्वेमधून दिसतंय



