Uncategorized

अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई व दुष्काळी अनुदान, २५ टक्के अग्रिम पीक विमा खात्यात जमा करावा:-सुलेमान शेख

मुखेड : प्रतिनिधी

तालुक्यात जुलै महिण्यामध्ये सर्वच महसूल मंडळात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे नदी, नाले व ओढ्यांना पुर येवुन पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्यामुळे घरांची पडझड, घरातील अन्नधान्याची नासाडी व संसार उपयोगी साहित्याचे, जनावरांचे तसेच शेतक-यांच्या शेतीचे, गोठ्यांचे, जमिनिचे अतोनात नुकसान झाले आहे या आस्मानी संकटामुळे होत्याचे नव्हते झाले आहे परंतु या नुकसानीचे पंचनामे होवुनही बराच कालावधी उलटला पण शेतकऱ्यांना अद्यापर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांची यादी तयार करुन त्यांना आर्थिक मदत करावी तसेच २५ टक्के मंजूर झालेल्या अग्रीम पिक विम्याची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुलेमान शेख यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खरीब पिकातील सोयाबीन, मुग, तूर, उडीद इत्यादी पिकांची तालुका प्रशासनाच्या वतीने तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात आले सदरचे पंचनामे पूर्ण करुन कर्मचाऱ्यांनी महसूल विभागाकडे जमा करण्यात आले आहे. पंचनामे जमा करूनही एक महिना झाला आहे तरी दुष्काळाची यादी तयार झाली नाही. त्यामुळे दुष्काळी अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित मिळवून देण्यासाठी प्रशासनानी शेतकऱ्याची यादी तयार करुन दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे तसेच पिकविम्याची २५ टक्के अग्रीम विमा रक्कमसुद्धा शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावे अशी महत्वपूर्ण मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सचिव सुलेमान शेख यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button