उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा; रुग्णच आणतात बाहेरून औषधे.

▫️लोकप्रतिनिधीचे उपजिल्हा रुग्णालयाकडे दुर्लक्ष
▫️डेंग्यूची तपासणी होत नाही;बाहेरून तपासणीस मोजावे लागते ९०० ते १००० रुपये
मुखेड प्रतिनिधी:- ०८ जुलै २०२५
उपजिल्हा रुग्णालय येथे दिवसभरात शंभर ते दीडशे बाह्य रुग्ण ओपीडी होत आहे. ग्रामीण भागातीलगोरगरीब रुग्ण, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची उपचार घेण्यासाठी गर्दी असते. मात्र, रुग्णालयातीलऔषध वाटप विभागात NS आयपी स्लाईन , मेट्रोनिडाझोल इंजेक्शन ip ,औषधांचा व आमलपित्ताच्याइंजेक्शन साठा संपला असल्याने गरीब रुग्णांना स्वत: बाहेरून औषधे खरेदी करावी लागत आहेत.
त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत असून, शासनाने व लोकप्रतिनिधीने विशेष लक्ष देत औषधी तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रुग्णांन कडून व जनतेतून केली जात आहे.
गरीब रुग्णांचा आधार असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात चांगली सुविधा मिळावी, या आशेने आलेल्यारुग्णांना इतर काही औषंधांसह आवश्यक असल्यास इंजेक्शनची सिरिंज व सुईही बाहेरूनही खरेदीकरून आणावी लागते. चांगली सुविधा मिळावी म्हणून रुग्णही प्रतिप्रश्न न करता निमूटपणे सहन करतात, अशी कैफियत काही रुग्णांंनी ‘श्रमिक एकता न्यूज़ ’शी बोलताना मांडली.
रुग्ण महागड्या वैद्यकीय सेवांमुळे मोफत चांगली सुविधा मिळणार या आशेने शासकीय उपजिल्हा रुग्णालयांकडे ग्रामस्थांचा कल वाढत आहे. परिणामी औषधांची मागणी देखील वाढत आहे. यारुग्णालयांना जिल्हा औषध भांडार व ग्रामीण रुग्णालयाला रुग्ण कल्याण समितीच्या मार्गदर्शनाखालीऔषधे खरेदी करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार औषधांचा तसेच, सिरिंजचा तुटवडा निर्माण झाल्यासही खरेदी करता येते. परंतु, काही ग्रामीण रुग्णालय व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्याची माहितीविश्वसनिय सुत्रांनी दिली. रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर प्रथम केसपेपर काढतो. वैद्यकीय अधिकाºयानेतपासल्यानंतर काही रुग्णांना इंजेक्शन देण्याचे सांगितले जाते. हा रुग्ण इंजेक्शन घेण्यासाठी गेल्यानंतरत्याला बाहेरून सिरिंज (सुई) खोकल्याचे औषध, आमलपित्ताच्या इंजेक्शन ,NS आयपी स्लाईन ,मेट्रोनिडाझोल इंजेक्शन ip विकत आणायला सांगितले जाते. सेवा चांगली मिळावी, या आशेने रुग्णहीप्रतिप्रश्न न करता निमूटपणे हे सर्व सहन करतो.
रुग्णांना बाहेरूनच इंजेक्शन आणण्याचे सांगितले जात आहे. हा रोजचा नित्याचाच प्रकार असल्याचेकाही कर्मचारी खासगीत सांगतात. मात्र, उघडपणे बोलेले तर वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागेल या भितीने बोलत नाहीत.
पावसाळ्यामुळे व वातावरणाच्या बदलामुळे तापाने फणफणलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, रुग्णांची तपासणी किंवा दाखल केल्यानंतर डेंग्यूची तपासणी करण्यासाठी डॉक्टर सांगतात. मात्र, रुग्णालयात डेंग्यू सदृश आजाराची तपासणी देखील होत नसल्याने रुग्णांना खासगी रक्त तपासणी लॅबमधून जवळपास ९०० ते १००० रुपये खर्च करून तपासणी करून घ्यावी लागत आहे.
ग्रामीण भागातील गरीब नागरिकांच्या आर्थिक अडचणीत भर पडली असून, या रुग्णालयात येणारे रुग्णहे गरीब कुटुंबातील असतात. रुग्णालयात औषध उपलब्ध होत नसल्याने गरीब, गरजू रुग्णाची गैरसोय होत आहे.
औषध खासगी मेडिकलमधून घेणेही परवडत नाही त्यामुळे औषधी तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशीमागणी रुग्णांन व जनतेकडून केली जात आहे.



