विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापराकडे पालकांनी कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे -प्रसिद्ध कवयत्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांचे प्रतिपादन

▫️शिवाजी विद्यालयात मातोश्री स्व. सौ. सुलोचनाताई गुरुनाथराव कुरूडे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण संपन्न
नांदेड प्रतिनिधी : ०८ सप्टेंबर
विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचन, अभ्यास, व्यायाम करून निसर्गाच्या जवळ गेले पाहिजे, विद्यार्थ्यांनी एक तासापेक्षा जास्त वेळ मोबाईलचा वापर करूनये विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापराकडे पालकांनी कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा प्रसिद्ध कवयत्री डॉ. वृषाली किनाळकर यांनी केले.
श्री शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिकनगर नांदेड च्या वतीने मातोश्री स्व. सौ. सुलोचनाताई गुरुनाथराव कुरूडे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात नुकताच संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष वैजनाथराव कुरूडे होते तर व्यासपीठावर माजी आमदार गुरूनाथराव कुरूडे, श्री शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिकनगर नांदेडचे मुख्याध्यापक सुधीर कुरुडे, उप मुख्याध्यापक सदानंद नळगे, शालेय समितीचे सदस्य दत्ताञय कुरूडे, संयोजन समितीचे सदस्य सुर्यकांत कावळे, सौ. विजयाताई कुरूडे, प्रा. जाभरूणकर, गोधने, उपप्राचार्य डॉ मधुकर शिंदे, प्राथमिकचे मुख्याख्यापक पंढरिनाथ काळे, आर. सी. गायकवाड, सत्यवान पारेकर, प्रा वसंत राठोड, सययद जमील, आनंद सुरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. वृषाली किन्हाळकर पुढे म्हणाल्या की,
फक्त शाळेतील शिक्षण म्हणजे शिक्षण नव्हे शिक्षण हे निरंतर प्रक्रिया आहे. आपणास सजिव निर्जीव गोष्टी कडून बरेच काही शिकता येते. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुमचे मित्र तुम्हाला शिकवत असतात. जगातल्या प्रत्येक भाषेत, जातीत, धर्मामध्ये आईची भाषा सर्वांना समजते आई ही जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या मुलांच्या कल्याणकारी विचार करत असते. समाजामध्ये मुलगा आणि मुलगी जन्मास आली तरी एक सारखाच आनंद साजरा केला जात नाही हे भारताचे फार मोठे दुर्दैव आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपमुख्याध्यापक सदानंद नळगे करताना म्हणाले की, संस्थेचा मूळ पाया रचत असताना मातोश्री मुक्ताई धोंडगे आणि मातोश्री सुलोचनाताई कुरूडे यांचे कष्ट आणि त्याग हे अतिशय महत्त्वाचे आहेत त्यांच्या अफलातून कष्टामुळेच एवढी मोठी संस्था महाराष्ट्रभर उभारलेली आहे याचे विस्मरण कोणालाही होणार नाही. माजी आमदार गुरुनाथ कुरूडे यावेळी म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बहुजनांच्या मुलांना घडवण्याचे काम करताना शिक्षकांच्या व पगारासाठी स्व. सौ. सुलोचनाताई कुरुडे यांनी आपले दहा लाखाचे दागिने संस्थेच्या हितासाठी दिले. अशिक्षित असतानाही संस्थेसाठी त्यांनी केलेला त्याग अतिशय महत्त्वाचा आहे. हा त्याग समाजाला समजावा म्हणून त्यांच्या नावे ही जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन संस्थेच्या नांदेड येथील शाखेत केले गेले.
अध्यक्ष समारोप करताना प्रा. वैजनाथराव कुरूडे म्हणाले की, धोंडगे आणि कुरूडे परिवाराचे शिक्षण, समाजकारण, राजकारण, यामध्ये मोठे योगदान आहे व केशवराव धोंडगे आमचे मार्गदर्शक होते. मी लहान होतो आम्हाला आई-वडीलांची भिती वाटत नव्हती पण धोंडगे साहेबांना घाबरत होतोय. ते योजना आखत असत त्याला मूर्त रूप देण्याचे काम गुरूनाथराव कुरूडे करीत असत. त्यांच्या आणि इतर सहकारी यांच्या त्यागातूनच श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी उभी राहिली. त्यातीलच एक त्यागमूर्ती म्हणजे स्व. सौ. सुलोचनाताई कुरूडे त्यांनी संस्थेसाठी आपले सर्व दागिने देताना माझा दागिना म्हणजे माझे पती आहेत त्यांच्या चेह−यावरचा ताण मला पहावत नाही ही भावना ठेवून संस्थेसाठी दागिने देऊन त्याग दाखवीला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय स्वाती कान्हेगावकर यांनी करून दिला. वक्तृत्व स्पर्धेत पहिला गट इयत्ता ५ ते ८ साठी प्रथम क्रमांक सचिन सिद्धांत टोंगळे तर द्वितीय क्रमांक कु. संचिता सुभाषराव अष्टेकर, तृतीय क्रमांक आलिशा जाकीर शेख तर उत्तेजनार्थ कु. अपूर्वा अनिल सोनकांबळे यांनी पटकावला. दुसरा गट वर्ग ९ वी ते १२ वी साठी प्रथम क्रमांक आविष आनंदराव वाघमारे, द्वितीय क्रमांक धनंजय बाबू गावंडे, तृतीय क्रमांक श्रेया बालाप्रसाद पांचाळ तर उत्तेजनार्थ श्रावणी मनोज कुमार पाटील यांना देण्यात आले. या स्पर्धेसाठी जवळपास १३० शाळांनी सहभाग नोंदवला पहिल्या गटात ६० तर दुस−या गटात ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेत खेड्यापाड्यातील शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम कौसल्ये यांनी केले. आभार अपर्णा लाडेकर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



