माणुसकीचा महामेरू! आमदार संतोष बांगर यांच्या रूपाने कळमनुरीला लाभला ‘दीन-दुबळ्यांचा कैवारी’; रुग्णसेवेचा झंझावात पाहून महाराष्ट्र थक्क!

मुखेड /प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज़ २३ एप्रिल २६
राजकारणाच्या धकाधकीत अनेकदा समाजकारण मागे पडते, पण कळमनुरी विधानसभेचे आमदार तथा शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख मा. संतोष बांगर यांनी मात्र आपल्या कार्यातून ‘माणुसकी‘ हीच सर्वश्रेष्ठ जात असल्याचे सिद्ध केले आहे. केवळ घोषणाबाजी न करता, प्रत्यक्ष मैदानात उतरून सर्वसामान्यांच्या अश्रूंना हात लावणारा हा ‘जनसामान्यांचा भिडू’ सध्या संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
आमदार संतोष बांगर यांची कार्यशैली ही केवळ फाईलीं पुरती मर्यादित नसून ती थेट जनतेच्या काळजाला भिडणारी आहे. त्यांच्या दारी आलेला कोणताही गरजू व्यक्ती रिकाम्या हाताने परत जात नाही, हा आजवरचा इतिहास आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी ज्या पद्धतीने रुग्णसेवा केली, ती पाहून अनेकांनी त्यांना ‘रुग्णांचा देवदूत’ ही उपाधी दिली आहे.
कर्करोग (कॅन्सर) आणि मेंदूविकार यांसारख्या अत्यंत खर्चिक आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना त्यांनी तातडीने आर्थिक बळ दिले.
गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या लहान मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी आणि औषधो पचारासाठी त्यांनी पुढाकार घेत त्यांची पुढील व्यवस्था थेट मुंबईत केली आहे.
दिव्यांग व्यक्तींना केवळ आर्थिक मदतच नाही, तर त्यांना आवश्यक असणारी शासकीय प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी प्रशासनाला कडक सूचना दिल्या, जेणेकरून त्यांना भविष्यात सरकारी योजनांचा लाभ घेता येईल.
गुडघ्याचे बॉल निकामी होणे किंवा पोटाचे गंभीर विकार असलेल्या रुग्णांना मोठ्या रुग्णालयात दाखल करून त्यांच्या शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा केला.
ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरात गेल्यावर अनेक अडचणी येतात. ही अडचण ओळखून आमदार संतोष बांगर यांनी स्वतःच्या माध्यमातून मुंबईतील नामांकित रुग्णालयांमध्ये या रुग्णांची सोय केली आहे. यामुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेक गरिबांना दर्जेदार उपचार मिळणे सुलभ झाले आहे.
जाती-पाती पलीकडील माणुसकी कोणताही भेदभाव न करता, केवळ रुग्ण आणि त्याची गरज बघून आमदार बांगर यांनी दिलेला हामदतीचा हात सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार संतोष बांगर यांच्या या अफाटकार्याबद्दल हिंगोली जिल्ह्यातूनच नव्हे, तर संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “आमदार असावा तर असा,” अशा शब्दांत नागरिक आपल्या भावना व्यक्त करत आहेत. कोणत्याहीफळाची अपेक्षा न ठेवता, अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या या नेतृत्वामुळे कळमनुरी मतदारसंघाची मान अभिमानाने उंचावली आहे.
“गोरगरिबांच्या सेवेसाठी माझी झोळी सदैव रिकामी करायला मी तयार आहे, कारण जनतेचे समाधान हीच माझी खरी संपत्ती आहे!”
अशाच धीरदत्त शब्दांत आमदार संतोष बांगर आपली भूमिका मांडतात आणि ते त्यांच्या कृतीतूनही दिसून येते.
खरोखर, आमदार संतोष बांगर यांचे हे कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही!



