सामाजिक

तुपदाळ खु. येथे उन्हाच्या तीव्रतेमुळे कडब्याला भीषण आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

मुखेड/ तुपदाळ खु प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २६ मे २६ 

तालुक्यातील तुपदाळ खुयेथे उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतातील कडब्याच्या गंजीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहेया आगीत हणमंत रघुनाथ बोडकेजळशिंग मारोती बोडके आणि दादाराव नामदेव दोमाटे या शेतकऱ्यांच्या जवळपास १५ ते २० हजार कडबा पेंढ्या जळून खाक झाल्या असूनअंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्या उन्हाळा अंतिम टप्प्यात असून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहेयाच कडक उन्हामुळे तुपदाळ खुयेथील शेतात साठवून ठेवलेल्या कडब्याच्या गंजीने अचानक पेट घेतलावाळलेला कडबा असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण ढीग आगीच्या भक्ष्यस्थानी पडलावर्षभर जनावरांच्या चाऱ्याची सोय व्हावी म्हणून साठवून ठेवलेला चारा डोळ्यादेखत जळत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

आगीची माहिती मिळताच तुपदाळचे सरपंच संदिप चंद्रकांतराव घाटे तुपदाळकर यांच्यासह गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतलीआग आटोक्यात आणण्यासाठी मुखेड नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला तातडीने पाचारण करण्यात आले.

अग्निशामक दल पोहोचेपर्यंत सरपंच संदिप घाटेधोंडगीर महाराज गिरीगजानन गिरी ग्रामपंचायत सेवकज्ञानेश्वर दोमाटेउद्धव पाटील बोडकेअमोल पाटील बोडकेरणवीर दोमाटेशिवाजी गुरुजीबोडकेमाधव दोमाटेदुर्योधन दोमाटेसचिन दोमाटे आणि तुकाराम पिटलेवाड यांच्यासह ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझवण्यासाठी मदत केली.

या भीषण आगीमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असूनसंबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ भरपाई मिळावीअशी मागणी गावातील नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button